Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

सांबरा येथे उद्या भव्य कुस्ती मैदान

बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत. विमानतळ लगतच्या मैदानावर आखाडा बनवण्यात आला आहे. कुस्ती शौकिनांसाठी बसण्याची तसेच पार्किंगची सोय करण्यात आली आहे. प्रमुख कुस्ती महान भारत केसरी …

Read More »

महिलांनी आर्थिक विकास करणे गरजेचे

बेळगाव : साई कॉलनी, आनंदनगर वडगाव येथील श्री साई महिला मंडळाने महिला दिन साजरा केला. याप्रसंगी डॉ. अनुपमा चंद्रशेखर धाकोजी व सौ. अनिता दत्ता कणबर्गी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. धाकोजींनी रजोनिवृत्ती आणि काळजी याविषयी माहिती दिली आणि स्त्रियांना वयानुसार होणारे बदल आनंदाने स्वीकारण्यास सांगितले. ही प्रक्रिया सुलभ व्हावी …

Read More »

तुमकूरमध्ये भीषण अपघात; बस पलटून ८ ठार, २० जखमी, मृतांमध्ये ६ विद्यार्थी

तुमकूर : येथील पालावल्ली तलावाजवळ शनिवारी (दि.१९) बस पलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ प्रवासी जागीच ठार झाले, तर २५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असून, काही प्रवासी बसमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याचे समजते. तुमकूर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसमध्‍ये १०० हून अधिक …

Read More »

सांबरा येथे गाव मर्यादित कुस्त्या उत्साहात

बेळगाव : शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीला कुस्तीकडे आकर्षित करण्यासाठी सांबरा येथे आयोजित गाव मर्यादित कुस्त्या उत्साहात पार पडल्या. सुमारे 90 हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. कुस्ती कमिटीचे सदस्य शितलकुमार तिप्पाण्णाचे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या कुस्त्या पुरस्कृत केल्या होत्या. विजेत्या आणि सहभागी सर्व मल्लांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल आणि खाऊचे …

Read More »

विद्यार्थ्यांनी मोठे उद्दिष्ट ठेवले पाहिजे : महादेव चौगुले

बेळगाव : आपल्या जीवनात मोठे होण्यासाठी मोठे उद्दिष्ट ठेवले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने कष्ट व मेहनत घेतली पाहिजे तरच माणूस आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष व उद्योजक महादेव चौगुले यांनी तारांगण मार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभात …

Read More »

राज्यातील शळांमधून भगवद्गीतेचा अभ्यास?

शिक्षणमंत्र्यांचे संकेत, नैतिक शास्त्राचा पाठ लागू करण्याचा विचार बंगळूर : मुलांमधील सांस्कृतिक मूल्ये नष्ट होत असल्याचा दावा करत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले की, अनेकांनी नैतिक शास्त्र सुरू करावे अशी मागणी केली आहे. शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता समाविष्ट करण्याची गुजरात सरकारची योजना असताना, कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक …

Read More »

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

बेळगाव : विद्यार्थ्यांनी मेहनत जिद्द चिकाटी ठेवली, तर ध्येय गाठणे सहज शक्य आहे. नापास झालो, म्हणून खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न केल्यास, यश निश्चित मिळते, असे उद्गार क्रिष्ण डायगोस्टिक पुणेचे उपाध्यक्ष श्री. अनिल जी. साळुंखे यांनी काढले. त्यांनी पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी …

Read More »

पदवीधरानो आपला मतदानाचा हक्क मिळवा!!

पदवीधर हे देशाचे जाणते आधारस्तंभ आहेत. मराठा शिक्षित युवकांनी देश पुढे नेण्यासाठी काम करण्याची गरज आहे.यादृष्टीने सर्व मराठी पदवीधर लोकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारयादीत नाव नोंद करण्याचे काम सकल मराठा समाज बेळगावच्यावतीने 14 मार्च 2022 पासून सुरू करण्यात आले आहे. चवाट गल्ली बेळगाव येथील सुनिल जाधव सेवा केंद्राच्या …

Read More »

पहिले रेल्वे गेट शनिवारी पूर्ण दिवस बंद

बेळगाव : रेल्वे खात्याकडून डब्लिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे लेव्हल क्रॉसिंग गेट नं. 383 अर्थात टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट शनिवार दि. 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रविवार दि. 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिक आणि वाहनचालकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे …

Read More »

पत्रकाराच्या घरात चोरी; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

बेळगाव : घरात कोणी नसलेले पाहून दरवाज्याची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बेळगाव शहरातील गणेशपुर सरस्वती नगर येथे गुरुवारी घडली आहे. बेळगाव येथील दैनिक सकाळचे क्रीडा प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांच्या घरी ही चोरी झाली असून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास …

Read More »