बेळगाव : आज कृतिशील मराठा समाज आणि बँक हितचिंतकांची महत्त्वपूर्ण बैठक श्री जत्तीमठ देवस्थान येथे पार पडली. मराठा सहकारी बँकेत सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबविली नसल्याचा आरोप बैठकीत हितचिंतकांकडून करण्यात आला. या बँकेत 22 जागांची नोकर भरती प्रक्रिया संशयास्पदरित्या झाली असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. मराठा …
Read More »LOCAL NEWS
बेनाडीत क्लुझर मोटारीने धडक दिल्याने आटपाडीतील दुचाकीस्वार गंभीर जखमी
निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या क्लुझर मोटारीने पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.१८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बेनाडी येथील मल्लिकार्जुन नगर बस स्टॉप समोर घडली. या अपघातात शत्रुघ्न गवळी (वय ३० रा. आटपाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना …
Read More »बेळगाव महापौर पदी प्रीती कामकर तर उपमहापौर पदी हनुमंत कोंगाळी यांची निवड
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेवर भाजपने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत जातीच्या समीकरणाचा आधार घेत बेळगाव शहराचा प्रथम नागरिक बनण्याचा मान विणकर समाजाला देण्यात आला असून त्याप्रमाणे महापौर पदी प्रीती कामकर निवड करण्यात आली तर उपमहापौरपदी लिंगायत समाजाच्या हनुमंत कोंगाळी यांची वर्णी लागली आहे. महापौर निवडीसाठी भाजप आमदार अभय …
Read More »कवळेमठाच्या जमिनीतील अतिक्रमणाविरोधात श्री शिवानंद सरस्वती स्वामीजींची ठाम भूमिका
बेळगांव :खानापूर तालुक्यातील सर्वेक्षण क्रमांक 30, 38, 40 आणि 45 या जमिनीच्या मालकी व ताब्याबाबतचा वाद पुन्हा पेटला असून अतिक्रमणाच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कवळेमठाचे 77 वे मठाधीश श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी यांनी सदर जमीन मठाच्या मालकीची असताना त्यामध्ये अतिक्रमण झाल्याचा आरोप केला असून …
Read More »इस्कॉनतर्फे श्री रामनवमीचे आयोजन
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे शुक्रवार दि. 27 मार्च 2026 रोजी रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर टिळकवाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत दिनांक 23 ते 27 मार्च दरम्यान रोज सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत परमपूज्य अनंत कृष्ण गोस्वामी महाराज यांच्याद्वारे रामनवमी …
Read More »बेळगावात बनावट नोटा खपवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
५०० रुपयांच्या ४९५ नोटा आणि स्विफ्ट कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त बेळगाव : बेळगावमध्ये आंतरराज्य बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील चार आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे. जेएमएफसी न्यायालयाने या चारही आरोपींना २७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अटक झालेल्यांची नावे मोहम्मद हसुवा, …
Read More »शाहूनगरमधील मनपा अतिक्रमण हटाव मोहिमेला अचानक ब्रेक
बेळगाव : बेळगावमधील शाहूनगर भागात अनधिकृत इमारत पाडण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला शेवटच्या क्षणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे मोठा धक्का बसला. यामुळे सुरू झालेली पाडकामाची कारवाई अर्धवट थांबवावी लागली असून महापालिका अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. शाहूनगरमधील जाधव नावाच्या व्यक्तीची इमारत गेल्या पाच वर्षांपासून कायदेशीर वादात अडकली होती. महापालिकेच्या नियमानुसार, …
Read More »पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रॉपर्टी परेडद्वारे चोरीच्या मालाचे वितरण
बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांनी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ६ कोटी ३६ लाख ९३ हजार ७४३ रुपये किमतीचा मुद्देमाल ‘प्रॉपर्टी परेड’द्वारे मूळ मालकांना हस्तांतरित केला. पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात तक्रारदारांना त्यांचा चोरीला गेलेला ऐवज सन्मानपूर्वक परत करण्यात आला. २०२५ मध्ये शहरातील विविध …
Read More »वादळी वाऱ्यासह गारपीट; रमजानच्या बाजारपेठेचे मोठे नुकसान
बेळगाव : बेळगावमध्ये आज दुपारी आलेल्या मुसळधार वळिवामुळे वीरभद्र नगर आणि खुस्रो नगरमध्ये पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. रमजान सणानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले २० पेक्षा जास्त स्टॉल्स वादळाच्या वेगामुळे कोसळले असून, यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास व्यापारी सणानिमित्त ग्राहकांसाठी खाद्यपदार्थ तयार करत असतानाच …
Read More »एका दिवसांनी पुढे ढकलली कृतीशील मराठा समाज बैठक
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निधन झाल्याने मंगळवारी सायंकाळी जत्तीमठ येथे आयोजित कृतिशील मराठा समाजाची बैठक एका दिवसांनी पुढे ढकलली आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता होणारी बैठक आता बुधवारी 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. मराठा समाजासमोरील विविध आव्हाने आणि मराठा समाजातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta