Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

दगडफेकीत सहा पोलिस जखमी : पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद

  बेळगाव : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला नाही. बेळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, दगडफेकीचा कट रचणाऱ्या गुन्हेगारांना आम्ही अटक करू. हत्तरगी टोलजवळ माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, रस्ता मोकळा करताना चुकून लाठीचार्ज झाला. दगडफेकीत सहा पोलिस जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू …

Read More »

धामणे गावातील अपुऱ्या व अनियमित बस सेवेमुळे त्रस्त ग्रामस्थांचे रास्तारोको

  बेळगाव : धामणे गावामध्ये अपुऱ्या व अनियमित बस सेवेमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी धामणे येथे रास्ता रोको करून आंदोलन केले त्यामुळे काही काळ धामणे गावात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी वाहतूक पोलीस विभागाचे असिस्टंट ट्रॅफिक इन्स्पेक्टर एम. व्ही. बिल्लूर तसेच ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय यांनी आंदोलन स्थळी …

Read More »

हॉकी इंडिया शताब्दी वर्षानिमित्त हॉकी स्पर्धा संपन्न

  मुलांचा गोगटे संघ विजेता; आरपीडी संघ उपविजेता, मुलींचा संघ आरपीडी विजेता, जीएसएस उपविजेता बेळगाव : हाॅकी इंडियाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धा आयोजित स्पर्धांमधून मुलांच्या संघातून गोगटे संघ विजेता तर आरपीडी कॉलेज उपविजेता तर मुलींमधून आरपीडी विजेता तर जीएसएस संघ उपविजेता ठरला. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व …

Read More »

हत्तरगी टोल नाक्यावर तणाव; पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

  बेळगाव : बेळगावमध्ये ऊस उत्पादकांना प्रति टन ३५०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गंभीर वळण लागले असून निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. बेळगाव जिल्ह्यातील हत्तरगी टोल नाक्यावर ऊस उत्पादकांनी आपला निषेध तीव्र केला आहे, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने …

Read More »

करवे कार्यकर्त्यांचा सरकारविरोधात निषेध, पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले

    बेळगाव : उसाला ३५०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी मुडलगी तालुक्यातील गुर्लापुर येथे सुरू असलेला शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र झाला आहे. अनेक संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. करवे आणि शेतकऱ्यांनी आज बेळगावमध्ये निदर्शने केली आहेत. उसाला आधारभूत किंमत जाहीर करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष तीव्र झाला आहे आणि कर्वेंसह विविध …

Read More »

खानापूर तालुक्यातील समस्या निवारणासाठी जनस्पंदन कार्यक्रम घ्यावा; शिवस्वराज जनकल्याण संघटनेच्यावतीने निवेदन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील सार्वजनिक समस्या निवारण करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली जनस्पंदन कार्यक्रम घ्यावा असे निवेदन तहसीलदार साहेबांना व तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर साहेबांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी शिवस्वराज जनकल्याण संघटनेचे उपाध्यक्ष चापगाव ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रमेश धबाले, खजिनदार मुकुंदराव पाटील, ऍड अभिजीत सरदेसाई, सुनील पाटील, संदेश कोडचवाडकर, मिलिंद …

Read More »

शहापुरात श्री काळभैरवनाथ जयंती निमित्त विशेष पुजा अभिषेक

  बेळगाव : दिनांक १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने नाथ पै. चौक शहापूर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्ताने मंगळवार दिनांक ११ रोजी सायंकाळी चार वाजता होम, बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी अभिषेक, श्री …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दि. ६/११/२०२५ रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी आय.सी.एम्.आर- एन.आय.टी.एम् येथील सेक्शन ऑफिसर कावेरी मोहन कुंभार या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिक्षण समन्वयक सविता पवार यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुण्या सेक्शन ऑफिसर कावेरी मोहन कुंभार यांनी फीत …

Read More »

संजीवीनी फाउंडेशनमध्ये कार्तिकोत्सव कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा

  बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फाउंडेशनमध्ये नुकताच कार्तिकोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण परिसरात ११११ दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती, ज्यामुळे एक मनमोहक आणि प्रकाशमय वातावरण निर्माण झाले होते. कार्तिक महिना हा दिव्यांचा महिना मानला जातो आणि या परंपरेनुसार संजीवीनी फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे …

Read More »

अगरबत्ती व्यवसाय फसवणूक प्रकरणातील “त्या” भामट्याला जामीन मंजूर

  बेळगाव : अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक प्रकरणातील “त्या” भामट्याला बेळगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर (वय ३५, रा. पंढरपूर) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने ‘बी. एम. ग्रुप महिला गृहोद्योग समूह’ या नावाने महिलांना अगरबत्ती पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवले होते. प्रत्येक …

Read More »