Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

सुवर्ण विधानसौधमध्ये एससी/एसटी समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठक

  अनुसूचित जाती आणि जमातीच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे आश्वासन बेळगाव : बेळगावमधील सुवर्ण विधानसौधमध्ये कर्नाटक राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. मूर्ती एल. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या प्रलंबित समस्या आयोगासमोर …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात प्रवेशाची संधी

  बेळगाव : सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमाभागातील एकूण 865 गावातील जे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेवू इच्छितात त्यांचासाठी शिवाजी विद्यापीठाने फी सवलत जाहीर केली आहे. यामध्ये अनुदानित अभ्यासक्रमाांसाठी संपूर्ण ट्युशन फी व विनाअनुदानित अभ्यासक्रमाांसाठी 25% ट्युशन फी माफ करण्यात आली आहे. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी …

Read More »

प्रसंगानुरूप हजरजबाबी विनोद ही आचार्य अत्रे यांची खासियत : अनिल आजगावकर

  बेळगाव : प्रसंगानुरूप व हजरजबाबी विनोद करणे ही आचार्य अत्रे यांची खासियत होती त्यामुळेच अत्रे यांचे विनोद आजही प्रसिद्ध आहेत असे मत लेखक अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले. बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘आचार्य अत्रे आणि त्यांचे विनोदी विश्व’ या …

Read More »

“जगण्याचे पान” उलगडताना कवी परशराम खेमणे यांचे मनोगत

  शब्दगंध कवी मंडळात काव्यरसिकांची मेजवानी बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कवी समजून घेताना” या उपक्रमात कवी परशराम खेमणे यांनी “जगण्याचे पान” या शीर्षकाखाली आपले सहावे पुष्प गुंफत काव्यप्रेमींना समृद्ध अनुभव दिला. या कार्यक्रमात त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये, शैली …

Read More »

महिला वकिलाच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार

    बेळगाव : बेळगाव शहरात धक्कादायक घटना घडली असून भवानीनगर, मंडोळी रोडवरील ॲड. पूजा काकतकर यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने बेळगाव शहर परिसरात एकच खळबळ माजली आहे. हल्लेखोरांनी घराच्या पहिल्या मजल्याला लक्ष्य केले होते. त्यावेळी …

Read More »

आझमनगरच्या दंतवैद्याचा मृतदेह सापडला

  बेळगाव : तिलारी धरणाजवळ पाण्यात बुडालेल्या युवा दंतवैद्याचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला. यासाठी विविध संघ संस्थांच्या संयुक्त सहकार्याने शोध मोहीम राबविण्यात आली होती. आझमनगर परिसरातील काही तरुण शनिवारी तिलारी धरण परिसरात गेले होते. यामध्ये व्यवसायाने दंतवैद्यकीय असणाऱ्या डॉ. मोहम्मद शेहजान (वय 26) हा तरुण पोहण्यासाठी तिलारी धरणाजवळच असलेल्या अडक्याचा …

Read More »

महात्मा गांधींचे ग्राम सुराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार कटीबद्ध : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची तळागाळापर्यंत योग्य अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत राज विभागाने प्रभावीपणे काम केले पाहिजे, महात्मा गांधींचे ग्राम सुराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार ग्राम प्रशासनावर अधिक भर देत आहे, असे उद्गार जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काढले. शनिवारी सुवर्णसौधच्या …

Read More »

बेळगाव येथील तरुण डॉक्टरचा ‌तिलारी‌ धरणात बुडून मृत्यू

  बेळगाव : मित्रांसमवेत फिरायला गेलेला शाहूनगर येथील तरुण तिलारी धरणात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. महम्मद अमीरशा (वय 26, रा. शाहून नगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. अधिक माहिती अशी की, महम्मदने दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. शनिवारी तो काही मित्रांसमवेत तिलारी परिसरात …

Read More »

भैरू नाईक ठरला राजहंसगडाचा राजा, तर अक्षरा मजुकर ठरली राजहंसगडाची राणी

  ऐतिहासिक राजहंस गड चढणे-उतरणे स्पर्धा उत्साहात संपन्न बेळगाव : बेळगाव परिसरात पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक राजहंस गड चढणे-उतरणे स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेला यावर्षी शेकडो स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग …

Read More »

अथणी येथील लॉजमध्ये वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

  अथणी : अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी गावाच्या हद्दीतील प्रशांत हॉटेल अँड लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी लॉज मालकासह दोघांना अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लॉज मालक सरदार भगवंत कांबळे हा महिलेच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती …

Read More »