Saturday , August 29 2026
Breaking News

आझमनगरच्या दंतवैद्याचा मृतदेह सापडला

Spread the love

 

बेळगाव : तिलारी धरणाजवळ पाण्यात बुडालेल्या युवा दंतवैद्याचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला. यासाठी विविध संघ संस्थांच्या संयुक्त सहकार्याने शोध मोहीम राबविण्यात आली होती.

आझमनगर परिसरातील काही तरुण शनिवारी तिलारी धरण परिसरात गेले होते. यामध्ये व्यवसायाने दंतवैद्यकीय असणाऱ्या डॉ. मोहम्मद शेहजान (वय 26) हा तरुण पोहण्यासाठी तिलारी धरणाजवळच असलेल्या अडक्याचा वझर परिसरात पाण्यात उतरला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला होता. यासंबधीची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत मृतदेहाचा शोध घेतला होता. मात्र रात्री अंधारामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती. मोहीम पुन्हा सुरू करण्यासाठी रविवारी सकाळी एसडीआरएफ पथकातील सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, मुदस्सर तरनीकर, राजू टक्केकर मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. बेळगाव ग्रामीण पोलिसांचे पथक, एसडीआरएफ आणि वन विभाग यांच्या समन्वित संयुक्त प्रयत्नांतून मृतदेह यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

Spread the love  बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *