Saturday , August 29 2026
Breaking News

महिला वकिलाच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव शहरात धक्कादायक घटना घडली असून भवानीनगर, मंडोळी रोडवरील ॲड. पूजा काकतकर यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने बेळगाव शहर परिसरात एकच खळबळ माजली आहे. हल्लेखोरांनी घराच्या पहिल्या मजल्याला लक्ष्य केले होते. त्यावेळी पहिल्या मजल्यावर त्यांची मुलगी संस्कृती अभ्यास करत होती. सुदैवाने ती या घटनेतून थोडक्यात बचावली. गोळी घराच्या काचेला लागून काचेवर फायरिंगचे स्पष्ट चिन्ह दिसून आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गोळी लागलेली काच तपासासाठी एफएसएलकडे पाठवण्यात आली असून या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी काकतकर कुटुंबाला संरक्षण देण्याची हमी दिली असून तपासणी अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

Spread the love  बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *