Saturday , August 29 2026
Breaking News

प्रसंगानुरूप हजरजबाबी विनोद ही आचार्य अत्रे यांची खासियत : अनिल आजगावकर

Spread the love

 

बेळगाव : प्रसंगानुरूप व हजरजबाबी विनोद करणे ही आचार्य अत्रे यांची खासियत होती त्यामुळेच अत्रे यांचे विनोद आजही प्रसिद्ध आहेत असे मत लेखक अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले.
बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘आचार्य अत्रे आणि त्यांचे विनोदी विश्व’
या विषयावर बोलत होते. डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ, टिळकवाडी येथे कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, उपाध्यक्ष के एल मजूकर व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी श्री. आजगावकर यांनी अत्रे यांचे विविध क्षेत्रातील योगदान सांगून त्याचे गाजलेले अनेक विनोद सादर केले.
यावेळी अश्विनी पाटील, डॉ. श्रेयस चौगुले, रविंद्रनाथ जुवली,विजय वाईगडे, सुरेश खानोलकर ,प्रभाकर देसाई, बाळकृष्ण बिर्जे, वनिता जोशी, उल्हास पानसे यांनी हिंदी, मराठी, कन्नड गीते सादर केली तर भरत गावडे यांनी कविता सादर केली.
सुरेन्द्र देसाई यांनी प्रास्ताविक केले तर शिवराज पाटील यानी पाहुण्यांची ओळख करून दिली. विठ्ठल पोलो यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

Spread the love  बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *