Saturday , August 29 2026
Breaking News

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात प्रवेशाची संधी

Spread the love

 

बेळगाव : सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमाभागातील एकूण 865 गावातील जे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेवू इच्छितात त्यांचासाठी शिवाजी विद्यापीठाने फी सवलत जाहीर केली आहे. यामध्ये अनुदानित अभ्यासक्रमाांसाठी संपूर्ण ट्युशन फी व विनाअनुदानित अभ्यासक्रमाांसाठी 25% ट्युशन फी माफ करण्यात आली आहे. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश घेवू इच्छितात त्यांच्याक्रीता वसतिगृहाची फी माफ करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे अशा अभ्यासक्रमाांची प्रवेश परीक्षा दि. 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली असून त्याकरीता व ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा नाही अशा अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी दि.27/04/2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

सीमाभागातील विद्यार्थ्यांनी https://www.unishivaji.ac.in/mscadmission/For-Studentinformation या संदर्भातील सविस्तर तपशील करुन ईच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व नजीकच्या काळात कार्यशाळा लवकरच बेळगाव येथे आयोजित केली जाणार आहे. या संधीचा लाभ सिमावासिय विद्यार्थ्यांनी करुन घ्यावी हि विनंती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर, सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

Spread the love  बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *