Saturday , August 29 2026
Breaking News

मॉन्सूनपूर्व खरीपाच्या कामांना वेग

Spread the love

 

मृग नक्षत्र ४० दिवसांवर; अक्षय तृतीया पासून लगबग

निपाणी (वार्ता) : अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अक्षय तृतीयापासून प्रत्यक्ष खरिपाच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. मृग नक्षत्र ४० दिवसांवर येऊन ठेपले आहे. ग्रामीण भागात शेतकरी पारंपारिक पद्धतीने बैल जोड्या सह ट्रॅक्टर द्वारे मशागतीची कामे सुरू केली आहेत. सध्या वाढ झाली असली तरी सकाळ संध्याकाळ शेतीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.
यांत्रिकीकरणासह सिंचन सुविधेमुळे मशागतीची कामे बदलली असली तरी अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीनुसार पाडव्यापासून शेतीच्या कामांना शुभारंभ करतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती, शेत साफसफाईची कामे हाती घेतली आहेत. मृग नक्षत्र ४० दिवसांवर येऊन ठेपले असून, २५ मे पासून रोहिणी
नक्षत्राला सुरुवात होणार आहे. मृग नक्षत्राला अवघे चाळीस दिवस शिल्लक आहेत. सश शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची लागवड करणार असल्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमिनीची मशागत पूर्ण करून ठेवण्यावर भर दिला जात आहे. जमिनीची वेळेत मशागत केल्यास तणाचा व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच पावसाचे पाणी मुरण्यास मदत होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पेरणीची कामेही वेळेत पूर्ण होण्यासाठी ट्रॅक्टर, नांगर, रोटाव्हेटर, कुळव यांना मागणी वाढली आहे.

About Belgaum Varta

Check Also

नूतन मराठी विद्यालयामध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *