Monday , August 17 2026
Breaking News

योगामुळे आरोग्य स्वस्थ व सुंदर राहते : विजय बन्सुर

Spread the love

संजीवीनी फौंडेशन मध्ये योग दिन उत्साहात साजरा

बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संजीवीनी फाउंडेशनमध्ये योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले योग शिक्षक विजय बन्सुर यांनी योगाचे महत्त्व विशद करताना, योगासन केल्याने आरोग्य स्वस्थ आणि सुंदर राहते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी त्यांनी योगाचे विविध प्रकार, विविध आसनांमुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गेली ३० वर्षे मी नियमित योगाभ्यास करत असल्याने आजही तंदुरुस्त आणि तरुण आहे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान काळजी केंद्रातील रुग्ण व कर्मचारी यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अर्चना शिरहट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अक्षता अक्कोळे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. यावेळी संजीवीनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे विजय बन्सुर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता सूर्यवंशी यांनी केले. सरिता सिद्दी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन राठोड, बसम्मा बेनकट्टी, बिस्टव्वा नाईक यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *