Wednesday , August 19 2026
Breaking News

बोरगाववाडी- कसनाळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकासह, विद्यार्थी, शेतकऱ्यातून संताप

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कोट्यावधी रुपये खर्चून पाच वर्षांपूर्वी खडीकरण, डांबरीकरणसह मजबुती झालेल्या बोरगाववाडी- कसनाळ रस्ता उध्वस्त होऊन खड्ड्यात गेला आहे. विस्कटलेल्या खडीमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात आहे
शेतकऱ्यांना प्रमुख असलेल्या या रस्त्याचे डांबरीकरण खडीकरण व मजबुतीकरण साठी साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी 3 कोटी 23 लाखांचा अनुदान मंजूर करण्यात आले. 25 जुलै 2017 साली कामास प्रारंभ होऊन 24 जून 2018 साली रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. 3 कोटी 23 लाख अनुदानातून मंजूर झालेल्या निधीतून खडीकरण व डांबरीकरण ही करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर पाचव्या वर्षी व सहाव्या वर्षीही संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे पुनर्रडांबरीकरण करण्यात यावे, असे आदेश होते. या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादक आहेत. त्यांना जवळच्या इचलकरंजी कृषी उत्पन्न मार्केटकडे जाण्यास हा जवळचा रस्ता आहे.
सध्या खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तसेच वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे. या परिसरातच शाळा असून पाल आणि विद्यार्थ्यांना होत आहे. आमचा गाव आमचा रस्ता या योजनेतून हा रस्ता करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *