Tuesday , August 18 2026
Breaking News

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योगा दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रस्त्यावरील अंकुरम इंग्लिश मीडियम शाळेतील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा जागतिक योग दिन शनिवारी (ता.२०) पार पाडला.
यावेळी संस्थेचे संचालक नारायण चौगुले, संचालिका नम्रता चौगुले, सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, प्राचार्या चेतना चौगुले त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
नारायण चौगुले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी रोज योगा व व्यायाम नियमित करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. त्याशिवाय योगा व त्याचे आध्यात्मिक महत्त्व, शास्त्रीय महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन त्याचे आपल्या आयुष्यातील महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी योग्य आणि पौष्टिक आहाराची सवय लावून घ्यावी व बाहेरील तयार अन्नपदार्थ खाण्याचे शक्यतो टाळावे याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन केले.
संस्थेचे संचालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार, गरुडासन, पवन मुक्तासन, नौकासन मर्कटासन भुजंगासन, वृक्षासन, सिंहासन अशी वेगवेगळी आसणे केली. तसेच योगा दिन व जागतिक पितृ दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांसोबत योगा करण्याचा आनंद या क्षणी अनुभवला. त्यामुळे या क्षणी सर्व विद्यार्थ्यांच्या वडिलांनी आपली उपस्थिती दर्शवून आपल्या पाल्यासोबत जागतिक पितृ दिन व योगा दिन एकत्रित साजरा केला. आराध्या खोत हिने सूत्रसंचालन केले. आराध्या कोळकी हिने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सौरभ कांबळे यांनी योग दिनाची प्रतिज्ञा करून घेतली यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *