Sunday , June 21 2026
Breaking News

उन्हाच्या चटक्यात शेकडो प्रवासी बस स्थानकावर

Spread the love

 

सुट्या, लग्नसराईमुळे प्रवाशांची गर्दी

निपाणी (वार्ता) : उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईमुळे येथील बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. रविवारी (ता. २६) तापमान ४३ अंशांवर गेले असताना अक्षरशः चटके सोसत प्रवासी आपल्या बसची प्रतीक्षा करताना दिसून आले. त्यामध्ये विशेषतः महिला वृद्ध नागरिकांनी लहान मुलांना त्रास होत आहे.
रविवारी उन्हाने विक्रम करीत ४३.४ अंशांचा पल्ला गाठला. शहराची निव्वळ भट्टी झाली होती. अशा वातावरणातही बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. दुपारी १२ ते ४ या वेळात प्रवासी अधिक असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे सर्व प्लॅटफॉर्मवर गर्दीच गर्दी होती. बस स्थानकात अपुरी जागा असल्याने सावली शोधून बसची वाट पाहत लहान मुले, महिला, वृद्ध यासह हजारो प्रवासी थांबले होते. गर्दीमुळे बसमध्ये जागा मिळावी, यासाठी प्लॅटफॉर्मर बस लागताच बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशी गर्दी करीत आहेत.
बस प्लॅटफॉर्मरवर फलाटावर लागताच लहान मुलांना खिडकीतून आत बसविण्यासह पिशव्या टाकून जागा पकडण्यासाठी प्रवाशी धावपळ करीत आहेत. निपाणी आगारातून अनेक बस बऱ्याच वेळा रद्द केल्या जात असल्याने य बसची संख्या कमी होत आहे. शिवाय बस प्लॅटफॉर्मवर लावल्यानंतर किमान तासभर थांबत असल्याने प्रवाशांची उन्हामुळे घालमेल होत आहे. तरी आगार प्रमुखांनी महत्त्वाच्या मार्गावर बसची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पावसाळ्यापूर्वी होणार मांगुर फाट्यावरील पिल्लर उभारणी

Spread the love  पश्चिमेकडून वाहतूकीचा मार्ग मोकळा : वेदगंगा नदीकाठ राहणार सुरक्षित निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *