
ऐतिहासिक राजहंस गड चढणे-उतरणे स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : बेळगाव परिसरात पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक राजहंस गड चढणे-उतरणे स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेला यावर्षी शेकडो स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
विशेष म्हणजे अवघ्या सहा वर्षांच्या बालस्पर्धकांपासून ते पंच्याहत्तर वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने स्पर्धेत भाग घेत स्पर्धेची शोभा वाढवली. त्यामुळे ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा न राहता सर्व वयोगटांना प्रेरणा देणारा उत्सव ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते भगवा झेंडा उंचावून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
स्पर्धेनंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानी अंकुश केसरकर होते. यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे, परशराम मोटराचे, प्रकाश अष्टेकर, दुदाप्पा बागेवाडी, नागेश बोभाटे, राजू पावले, राजू ओऊळकर, संजय बाळेकुंद्री, दत्ता उघाडे, शिवराज पाटील, विकास कलघटगी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की, आजपर्यंत हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घेतला असून, येथील अनेक विजेत्यांनी देशपातळीवर आपला नावलौकिक मिळविला आहे.
प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले की, गेली साठ वर्षे ही ऐतिहासिक स्पर्धा सातत्याने आयोजित करण्यात येत असून, यात मुले, मुली, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.
अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी यावर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सर्व स्पर्धकांचे आभार मानले व विजेत्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावर्षी भैरू नाईक याने उत्कृष्ट कामगिरी करत राजहंस गडाचा राजा हा किताब पटकावला, तर अक्षरा मजुकर हिने राजहंस गडाची राणी हा मान मिळविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विकास कलघटगी यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत कदम, रणजीत हावळण्णाचे, आकाश भेकणे, सचिन केळवेकर, विनोद आंबेवाडीकर, सुनिल आनंदाचे, सुहास हुद्दार, उमेश पाटील, सूरज कुडूचकर, सुरज चव्हाण, विकास भेकणे, साईनाथ शिरोडकर, प्रकाश गडकरी यांनी विशेष सहकार्य केले.
ही स्पर्धा बेळगावच्या शिवभक्तांसाठी परंपरा, शौर्य, आरोग्य आणि शिवप्रेम यांचे प्रतीक ठरत असून यंदाही मोठ्या उत्साहात पार पडल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
आठ वर्षाखालील (मुले)
१) वंश बिर्जे
२) अक्षद मारिहाळकर
३) ऋतुराज गोरल
आठ वर्षाखालील (मुली)
१) स्वराली कुडतरकर
बारा वर्षाखालील (मुले)
१)कृष्णकुमार पूजेरी
२) शुभम कुलगोड
३) श्रीकेत दळवी
बारा वर्षाखालील (मुली)
१) प्रेरणा पाटील
२)निरवी कलकुप्पी
३) स्वराणी गोरल
सोळा वर्षाखालील (मुले)
१) अथर्व नाईक
२) सुशांत कांबळे
३) साईनाथ पाटील
सोळा वर्षाखालील (मुली)
१) शिवानी शेलार
२) नम्रता सुतार
३) प्रियांका दौलतकर
खुला गट (महिला)
१) अक्षरा मजुकर गडाची राणी
२) नकुशा मंगनाकर
३) प्रतीक्षा घाडी
खुला गट (पुरुष)
१) भैरू नाईक गडाचा राजा
२) भूषण गुरव
३) दक्ष पाटील
खास सन्मान
ज्येष्ठ स्पर्धक सुरेश सांगावकर, सुरेश देवरमनी
Belgaum Varta Belgaum Varta