Monday , April 20 2026
Breaking News

हॉकी इंडिया शताब्दी वर्षानिमित्त हॉकी स्पर्धा संपन्न

Spread the love

 

मुलांचा गोगटे संघ विजेता; आरपीडी संघ उपविजेता, मुलींचा संघ आरपीडी विजेता, जीएसएस उपविजेता

बेळगाव : हाॅकी इंडियाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धा आयोजित स्पर्धांमधून मुलांच्या संघातून गोगटे संघ विजेता तर आरपीडी कॉलेज उपविजेता तर मुलींमधून आरपीडी विजेता तर जीएसएस संघ उपविजेता ठरला.
पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व टी-शर्ट देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बसवेश्वर बँकेच्या माजी अध्यक्षा शैलजा जयप्रकाश भिंगे, प्रगती वाहिनीचे संपादक एम के हेगडे, व्हिजिलन्स अॕडिशनल कमिशनर सागर देशपांडे, जी जी चिटणीस स्कूलच्या प्राचार्या नवीन शेट्टीगार तर अध्यक्षस्थानी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी होते.
प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हॉकी इंडियाचा वैभवशाली शंभर वर्षाचा इतिहास सांगितला तसेच बेळगाव ने देशाला तीन ऑलिंपिकवीर दिल्याचा उल्लेख केला. बेळगाव हे हॉकी खेळाचे माहेरघर म्हटले तर वावगे नाही. गतवर्षी बेळगाव मधून पाच हॉकीपटूंची मैसूर येथील डी वाय एस एस स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झाली आहे. बेळगाव शहराला अॕस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज आहे ती पूर्ण झाल्यास पुन्हा एकदा बेळगाव देशाला ऑलम्पिकवीर देऊ शकेल असे आश्वासन दिले.

प्रमुख पाहुण्या शैलजा भिंगे यांनी बेळगाव हाॕकीला पुन्हा भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रमुख पाहुणे पत्रकार एम के हेगडे यांनी हॉकीपटूंचे अभिनंदन करून प्रत्येक विद्यार्थ्याने खेळामध्ये लक्ष घालून आपले सामर्थ्य वाढवावे असे आवाहन केले.
अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव सुधाकर चाळके यांनी हॉकी प्रशिक्षण व खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी उपाध्यक्षा पूजा जाधव, सचिव सुधाकर चाळके, अमोदराज स्पोर्ट्सचे मुकुंद पुरोहित, दत्तात्रय जाधव, प्रशिक्षक उत्तम शिंदे, मनोहर पाटील, नामदेव सावंत, विकास कलघटगी, सिद्धार्थ चाळके, खानापूरचे प्रशिक्षक गणपत गावडे, आशा होसमनी, सविता हेब्बार, संजय शिंदे, एस एस नरगोडी, सुरेश पोटे, श्रीकांत आजगांवकर, संदीप पाटील, राजेंद्र पाटील, अश्विनी बस्तवाडकर, दीपक वेसणे, प्रशिक्षक अश्विनी पाटील, डॉ. गिरीजाशंकर माने आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *