बेळगाव : फिश मार्केट, कॅम्प, बेळगाव येथील सेंट अँथनी चर्च येथे शुक्रवार दि. 13 जून 2025 रोजी सेंट अँथनी यांचे वार्षिक फेस्त साजरे होत असून भक्तांनी फेस्तमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेंट अँथनी वार्षिक फेस्तप्रसंगी बेळगाव शहराच्या विविध भागातून आणि शहराच्या आसपासच्या गावांमधून हजारो यात्रेकरू …
Read More »LOCAL NEWS
वटपौर्णिमेच्यानिमित्ताने अन्नपूर्णेश्वर नगर येथील सान्सी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम…
बेळगाव : वटपौर्णिमा अर्थात सुवासिनींनी वडाला पुजण्याचा दिवस. आजच्या दिवशी सावित्रीने स्वतःचा पती सत्यवानाचे प्राण प्रत्यक्ष यमाकडून परत आणले. अशी आख्यायिका आपल्या हिंदू धर्मात सांगितली जाते. तिचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशातील लाखो स्त्रिया आजच्या दिवशी वटसावित्रीचा उपवास करतात. वडाला सात प्रदक्षिणा घालतात आणि हाच पती जन्मोजन्मी मिळू दे, …
Read More »बेळगावच्या निर्मात्यांनी साकारलेली मनोरंजनाची अफलातून ट्रीट “ऑल इज वेल” 27 जूनला चित्रपटगृहात
बेळगाव : मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब अनुभवायला …
Read More »बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी निलंबित पोलिसांच्या निर्णयाविरोधात अभाविपचे आंदोलन
बेळगाव : बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्या निलंबनाच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले. आज बेळगावातील आर.पी.डी. सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थिनी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपचे राज्य कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ …
Read More »मुडा प्रकरण : ईडीने १०० कोटीच्या ९२ मालमत्ता केल्या जप्त
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे संशयितांपैकी एक आहेत, अशा म्हैसूर शहर विकास प्राधिकरण ( मुडा ) भूखंडाच्या वाटप प्रकरणाशी संबंधित एका मोठ्या घडामोडीत, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अंदाजे १०० कोटी रुपयांच्या ९२ मालमत्ता जप्त केल्या आहेत. मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, ईडीने म्हटले आहे की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार …
Read More »राज्यात जातीय जनगणनेचे पुनर्सर्वेक्षण
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; हायकमांडच्या सूचनेवरून निर्णय बंगळूर, ता. १० : सध्याचा जात जनगणना अहवाल १० वर्षे जुना असल्याने सरकारने एका विशिष्ट वेळेच्या मर्यादेत पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी दिल्लीत घोषणा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “आजच्या बैठकीत आम्ही जातीच्या जनगणनेवर चर्चा केली. बैठकीत …
Read More »शेतातील विहिरीत बुडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू; अथणी येथील घटना
अथणी : बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात ५ वर्षाच्या मुलाचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज गिद्दप्पा वड्डर (वय ५) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मनोज घराबाहेर खेळत असताना नजीकच असलेल्या विहिरीजवळ गेला अन् पाय घसरल्याने तोल जाऊन …
Read More »जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स मेन यांच्यावतीने नेत्रदान जनजागृती फलक!
बेळगाव : जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स मेन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून सदाशिवनगर स्मशानभूमीत नेत्रदान जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत सचिव विजय बनसुर यांनी केले तर प्रास्ताविक माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनी जायंट्स आय फौंडेशनच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. प्रमुख …
Read More »हरहुन्नरी शिक्षिका शीतल बडमंजी यांना वाहिली श्रद्धांजली!
बेळगाव : हरहुन्नरी शिक्षिका शीतल बडमंजी यांची शोकसभा दिनांक ९ जून रोजी मराठी विद्यानिकेतन, गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, माजी विद्यार्थी संघटना मराठी विद्यानिकेतन व मराठा महिला मंडळ यांच्यातर्फे मराठी विद्यानिकेतन येथे शिक्षिका शीतल बडमंजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या, हरहुन्नरी, कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या शीतल बडमंजी यांचे …
Read More »मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त 20 जून रोजी गाऱ्हाने घालण्याचा कार्यक्रम…
बेळगाव : जुलै महिन्यात पार पडणाऱ्या वडगाव येथील ग्राम देवता मंगाई देवीच्या यात्रेसाठी शुक्रवारी (ता. २०) पारंपारिक पद्धतीने गाऱ्हाने घालण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या मंगाई देवीची यात्रा २२ जुलै रोजी पार पडणार असून दरवर्षी यात्रेच्या एक महिना अगोदर गाऱ्हाणे घातले जातात. त्यानुसार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta