बेळगाव : बेळगाव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून बुधवारी रात्री जोशी मळा खासबाग परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. बेळगाव शहरात चोरट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. जनतेला जीव हातात घेऊन सायंकाळच्या सुमारास फिरावे लागत आहे अशी परिस्थिती …
Read More »LOCAL NEWS
एस. आर. मोरे यांचा नागरी सत्कार सोहळा दिमाखात साजरा
बिजगर्णी : कावळेवाडी गावाच्यावतीने बिजगर्णी गावचे सुपुत्र, बिजगर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. आर. मोरे यांचा नागरी सत्कार सोहळा समिती हायस्कूलच्या प्रांगणात दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी होते. तसेच व्यासपीठावर माजी प्राचार्य आनंद मेणसे, मालोजीराव अष्टेकर, गोपाळ गावडा, डी. एन. मिसाळे, मनोहर बेळगावकर, आप्पा जाधव, …
Read More »हाजगोळी येथील चाळोबा तलावात बुडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू
चंदगड (प्रतिनिधी) : पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळीला गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि. १५ मे रोजी हाजगोळी चाळोबा तलाव परिसरात घडली असून वडील सुखरूप आहेत. याबाबत समजलेली अधिक महिती अशी की, सुळगा (ता. बेळगांव) येथील फिवोना सलोमन जमूला रा. आंबेडकर गल्ली, सुळगा (वय 11) …
Read More »“त्या” बँकेत कर्जासाठी फोफावला “एजंट”राज
आत्तापर्यंत आपण “त्या” बँकेच्या अंतर्गत व्यवहारातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार पाहिला. अध्यक्षाने संपूर्ण बँक कशी पोखरून ठेवली आणि कर्मचारी व इतर सहकाऱ्यांची पिळवणूक कशी केली हे “बेळगाव वार्ता”ने उजेडात आणले. पण अध्यक्षांचे प्रताप एवढ्यावरच थांबतील तर कसे? बँकेतील लोकांना धरून केलेला गैरव्यवहार कमी होता की काय पैसे कमविण्यासाठी या …
Read More »जिजाऊ ब्रिगेडच्या राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे हिंदू बाल संस्कार शिबिर संपन्न
बेळगाव : लहान मुलांपासून ते दहावीच्या मुला-मुलींसाठी एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन बुधवार दि. 15.5.24 रोजी येथील न्यू उदय भवनच्या सभागृहात करण्यात आले. प्रारंभी नोंदणी, न्याहारी झाल्यानंतर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सौ. सोनाली सरनोबत अन्य कार्यकर्त्या भगिनी, किशोर काकडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेची पूजा करुन शिबीराचा विधीवत …
Read More »माजी मंत्री, आमदार एच. डी. रेवण्णा यांना सशर्त जामीन
केआर नगरला जाण्यास मज्जाव बंगळूर : अपहरण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना विशेष लोक न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पुरावे नष्ट करू नये, परदेशात, केआरनगरसह गुप्त ठिकाणी जाऊ नये या अटींसह पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी जामीन मंजूर …
Read More »आमचे आमदार विकले जाणारे नाहीत; एकनाथ शिंदेना सिद्धरामय्यानी फटकारले
कर्नाटकाचे नाही, महाराष्ट्राचे सरकार कोसळण्याचा दावा बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावर त्यांना चांगलेच फटकारले. आमचे आमदार विकले जाणारे नसल्याचे सांगून राज्यातील काँग्रेस सरकार पाडता येणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात महाराष्ट्राप्रमाणे कारवाया होणार …
Read More »आनंदनगर परिसरातील घरातून ड्रेनेजमिश्रित पाणी
बेळगाव : रविवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे आनंदनगर परिसर पाण्याखाली आला होता. मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यावर वाहत होते. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अनेकांची जीवनावश्यक वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आनंदनगर परिसरातील नाल्याचे काम अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे नाल्यातून भरपूर प्रमाणात ड्रेनेजमिश्रित पाणी …
Read More »चलवेनहट्टी येथे प्रवेशद्वारावर कमान बांधण्याच्या कामाला सुरुवात
बेळगाव : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चलवेनहट्टी येथील गावच्या प्रवेशद्वार कमान बांधण्याच्या कार्याचा शुभारंभ आजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर काॅलम भरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुहासनी महिलांनी काॅलमची पुजा केली. यावेळी कार्यक्रमस्थळी भढजीच्या उपस्थितीत जोतिबा मारुती पाटील तसेच …
Read More »बेळगाव पोलिसांकडून 28 लाखाची दारू जप्त
बेळगाव : हार्डवेअरची वाहतूक होत असल्याची खोटी नोंद करून गोव्यातून आंध्र प्रदेशाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर बेळगावच्या यमकनमर्डी पोलिसांनी जप्त केला आहे. बेळगावचे एसपी भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, काल रात्री यमकनमर्डी पोलिसांनी लॉरीमधून सुमारे 28 लाख किमतीची 16,848 लिटर विविध प्रकारची दारू जप्त केली आणि लॉरी चालकासह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta