बेळगाव : बेळगाव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून बुधवारी रात्री जोशी मळा खासबाग परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.
बेळगाव शहरात चोरट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. जनतेला जीव हातात घेऊन सायंकाळच्या सुमारास फिरावे लागत आहे अशी परिस्थिती आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.