Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

शिवज्योतीचे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने स्वागत

  बेळगाव : विविध गडकिल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने धर्मवीर संभाजी चौक येथे करण्यात येत आहे. मंडळाचे उपाध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, उपाध्यक्ष मालोजी अष्टेकर, कार्यवाह मदन बामणे, कार्यवाह विजय पाटील, गणेश दड्डीकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेवक रवी साळुंखे, मोतेश बारदेशकर, आनंद आपटेकर, शहापूर शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष …

Read More »

उद्या दहावीचा निकाल : शिक्षण विभागाची माहिती

  बेंगळुरू : चालू शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या परीक्षांचा निकाल गुरुवार दि. ९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नाटक शालेय शिक्षण आणि मूल्यमापन समितीने जाहीर केली आहे. सकाळी १०.३० वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असून शासनाच्या https://karresults.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येऊ शकणार आहे. निकालासाठी शिक्षण विभागाने …

Read More »

बेळगाव वार्ताचा “त्या” बँकेला दणका!

  बेळगाव वार्ताने सातत्याने “त्या” बँकेच्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराबद्दल लिखाण करून त्यांचे पितळ उघडे पडण्याचा प्रयत्न केल्यामुळे अखेर त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. बेळगाव वार्ताने बँकेतील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबद्धल आणि त्यातील गैरकारभारबद्दल लिखाण केल्याने जागरूक सभासद व ग्राहकांनी अखेर त्या बँकेच्या अध्यक्षाला धारेवर धरले. पण हेकेखोर अध्यक्षाने आपला माजोर्डपणा …

Read More »

अथणी येथे मुस्लिम दाम्पत्यावर भाजप नेत्याचा हल्ला

  बेळगाव : अथणी तालुक्यातील अनंतपूर गावात चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजपच्या स्थानिक नेत्याने एका मुस्लिम दाम्पत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदानादरम्यान झालेल्या गदारोळात एका मुस्लिम जोडप्याला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून भाजपचे नेते बाबासाहेब दोंडीराम शिंदे यांनी या दाम्पत्याला मतदान केंद्रातून खेचून आणून त्यांच्याच दूध डेअरीत …

Read More »

सिद्धरामय्या, परमेश्वर यांची सीडी बाहेर आल्यास आश्चर्य वाटणार नाही : माजी मंत्री आ. रमेश जारकीहोळी

  गोकाक : प्रज्वल रेवण्णा प्रकरण ही कोणाला अभिमान वाटेल अशी गोष्ट नाही. हे प्रकरण अत्यंत वाईट असल्याची नाराजी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक आमदार रमेश जारकीहोळी यांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी गोकाक येथील लक्ष्मीदेवी मंदिरात पूजा केल्यानंतर मतदान केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार रमेश जारकीहोळी …

Read More »

एस. आर. मोरे यांचा नागरी सन्मान

बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मोरे यांच्या ८१ व्या यशस्वी कारकीर्दबद्दल नागरी सत्कार सोहळा आयोजन समिती बिजगर्णी -कावळेवाडी यांच्यावतीने १५ मे रोजी बिजगर्णी हायस्कूल येथे सकाळी दहा वाजता नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी (माजी आमदार), मालोजीराव अष्टेकर …

Read More »

बेळगाव मतदारसंघात ४०.७८ तर चिक्कोडी मतदारसंघात ४५.६९ टक्के मतदान

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज मंगळवारी सकाळी ७ वाजता बेळगावसह राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये प्रारंभ झाला असून दुपारी १ वाजेपर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघात ४०.७८ तर चिक्कोडी मतदारसंघात ४५.६९ मतदान झाले. बेळगाव जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज सकाळी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. विश्वेश्वरय्यानगर येथील …

Read More »

राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान

  २२७ उमेदवारांचे ठरणार राजकीय भवितव्य; २.५९ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क बंगळूर : चुरसीने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या (ता. ७) राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली असून मतदान केंद्रांसमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व १४ मतदारसंघातील …

Read More »

“त्या” बँकेचा जनरल मॅनेजर सुद्धा विकृत मनोवृत्तीचा!

  गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने “त्या” तथाकथित बँकेच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वाचली. आत्ता आणखीन एक किळसवाणा प्रकार सध्या चर्चिला जात आहे. मुळात बेकायदेशीरपणे निवड केलेला हा जनरल मॅनेजर अध्यक्षांच्या नात्यातला आहे. आणि या नात्यातील माणसाला नोकरी बहाल करण्यासाठी त्यांनी आधीच्या मॅनेजरला त्रास देवून राजीनामा देण्यास भाग पाडले. अध्यक्ष आणि या …

Read More »

फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे गोशाळेला पशुखाद्याचे वितरण

  बेळगाव : बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आज शिवापूर येथील मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी मठाच्या गोशाळेला पशुखाद्याचे वितरण करण्यात आले. अतिउष्णतेमुळे जनावरांसाठी पाणी आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली असून कूपनलिका आणि विहिरींच्या पाण्यानेही तळ गाठला आहे. अशावेळी मूक जनावरांच्या पाण्याचा आणि अन्नाचा तुटवडा भासत असून या पार्श्वभूमीवर बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स …

Read More »