Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

‘एक नोव्हेंबर काळ्या दिनी’ हजारोंच्या संख्येने सामील होणार; येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्धार!

  बेळगाव : एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना करून केंद्र सरकारने मराठी बहुभाषिक असलेला बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि 865 खेडी हा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. त्याला विरोध करण्यासाठी हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून संपूर्ण सीमा भागात पाळला जातो. येत्या मंगळवार दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी शहर …

Read More »

मारिहाळमध्ये नूतन बसवेश्वर मंदिराचे उद्घाटन

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावात नवनिर्मित श्री बसवेश्वर मंदिर व इतर मंदिरांचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री बसवेश्वर मंदिराच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते कळसारोहण …

Read More »

बिजगर्णीतील तालिम सुसज्ज करण्याचा प्रयत्न

  बेळगाव : बिजगर्णी (ता. बेळगाव) दीपावलीच्या शुभमुहूर्तावर श्री ब्रम्हलिंग कुस्तीगीर संघटनेची बैठक ब्रम्हलिंग देवालयात खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी वसंत अष्टेकर उपस्थित होते. संघटनेचे सचिव- वाय. पी. नाईक यांनी मागील सभांचा आढावा घेऊन उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या लालमातीत कुस्तीखेळाची मोठी परंपरा आहे. अलिकडे पुन्हा ग्रामीण भागातील तरुणपिढी विविध खेळाकडे वळत …

Read More »

बेळगांव सीमाभागातील मराठी जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय द्यावा…

  ठाणे :  बेळगांव, बिदर, भालकी, धारवाड, कारवारसह सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घेऊन नव्याने संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा व तेथील मराठी जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी “बेळगांव कुणाच्या बापाच” पुस्तकाचे लेखक अर्जुन विष्णू जाधव यांनी केली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा बेळगावातून सुरू झाला होता. बेळगाव सीमाभागातील मराठी …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते कृषी अवजारांचे वाटप

  बेळगाव : कृषी क्षेत्र बळकट झाले तरच देशाचा विकास शक्य आहे. याबाबत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते आज बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील एकूण 19 लाभार्थी शेतकऱ्यांना विविध अवजारांचे वाटप …

Read More »

कर्नाटकात आणखी एका स्वामीजींची आत्महत्या

  बेंगलोर : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात एका स्वामीजींनी आत्महत्या केल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच आणखी एका स्वामीजींनी भर दिवाळीतच आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचुगल बंडेमठ येथील श्री बसवलिंग स्वामीजी यांनी चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या खोलीच्या खिडकीला गळफास लावून …

Read More »

चन्नम्मा कित्तूर उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक

  बेळगाव : कित्तूर येथे आयोजित चन्नम्मा कित्तूर उत्सव-2022 ला आज भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. कित्तूर कलमठचे राजयोगिंद्र स्वामीजी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. बेंगळुरूपासून संपूर्ण राज्याचा प्रवास करून बैलहोंगल येथील चन्नम्मा समाधी येथून आलेल्या वीरज्योतीचे कित्तूर शहरातील चन्नम्मा चौक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, …

Read More »

रिंग रोडला प्रखर विरोध; येळ्ळूरवासियांचा निर्धार

  बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव परिसरातील सुपीक जमिनीतून ‘रिंग रोड’ करण्याचा जो घाट घातला आहे. शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी संपादनाद्वारे रिंग रोडच्या माध्यमातून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे कृत्य सरकार करत आहे. यासाठी येळ्ळूरची जनतेतर्फे सरकारच्या या कृत्याला प्रखर विरोध करण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आला. …

Read More »

दिवाळी पहाटची सूरमयी मैफल!

  रविवार : ऑक्टोबर रोजी सकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे आर्ट्स सर्कल बेळगांव प्रस्तुत दिवाळी पहाट हा कार्यक्रम रसिकांच्या लक्षणीय उपस्थितीत साजरा झाला. गायक कलाकार होते पं. आनंद भाटे. प्रारंभी सर्कलचे पदाधिकारी सदस्य रवींद्र माने यांनी कलाकारांचे आणि रसिकांचे स्वागत केले आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. गायक पं. आनंद भाटे …

Read More »

राज्यात भाजपचे सुटाबुटातील लुटखोर सरकार

  राहुल गांधींचा आरोप; कर्नाटकातील पदयात्रेची सांगता, तेलंगणात प्रवेश बंगळूर : सर्व जातींसाठी शांततेचे उद्यान असलेल्या कर्नाटकला काँग्रेस कधीही भाजपच्या द्वेषाची आणि कुशासनाची प्रयोगशाळा बनू देणार नाही. संपूर्ण देशासाठी कर्नाटक हे विकासाचे दीपस्तंभ आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. ४० टक्के कमिशनसाठी आज बदनामी झाली असून हे भाजपचे …

Read More »