बेळगाव : कोरोना काळात योगदान दिलेल्या आशा कार्यकर्त्या आणि आरोग्याधिकारी यांचा सत्कार शांताई वृद्धाश्रमात करण्यात आला. माजी महापौर विजय मोरे यांनी सर्व कोविड वॉरियरांचा सत्कार केला. या जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ आणि तालुका अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार, मनपा आरोग्याधिकारी संजीव डूमगोळ, टी एच ओ शिवानंद मास्तीहोळी, डॉ. शिवस्वामी एम एस, जे एन एम सी डॉ. प्रशांत धोंगडी, किणये पी एच सी चे डॉ. ॲलन विजय या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शांताईमधील सर्व आजी आजोबांचे लसीकरण झाले. नागेश चौगुले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते तर ॲलन मोरे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta