Thursday , March 5 2026
Breaking News

राजश्री शाहू दूध डेअरीतर्फे छ. शाहू जयंती साजरी

Spread the love

बेळगाव : कंग्राळी बी. के. येथील राजश्री शाहू दूध डेअरीतर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कंग्राळी बी. के. हायस्कूलचे शिक्षक खोबरगडे, लिपिक शशिकांत अष्टेकर आणि प्रमुख वक्ते म्हणून ॲड. सुधीर चव्हाण उपस्थित होते. शिक्षक खोबरगडे यांच्या हस्ते छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. शशिकांत अष्टेकर यांनी श्रीफळ वाढविल्यानंतर उपस्थितांनी महाराजांना अभिवादन केले. यावेळी बोलताना खोबरगडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. ॲड. सुधीर चव्हाण यांनी देखील समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमास राजश्री शाहू दूध डेअरीच्या संचालकांसह पत्रकार सदानंद चव्हाण, सुभाष चिखलकर, नागेश हुरुडे, लक्ष्मण हुरुडे, गणपत कोनेरी, विघ्नेश हुरुडे, मोनाप्पा भैरटकर, शत्रुघ्न पाटील आदींसह डेअरीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *