बेळगाव : दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनला बेळगावात शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झाला. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिल्याने बाजारात गर्दी झाली. मात्र ती तशी तुलनेत कमी होती.
बेळगावसह राज्यात लॉकडाऊन काही प्रमाणात उठवण्यात असला तरी स्थानिक परिस्थिती पाहून तो पूर्णतः, भागशः जारी करण्याचे अथवा उठवण्याचे अधिकार शासनाने स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी काही नियमांत बदलासह या आठवड्यातही विकेंड लॉकडाऊन जारी केला आहे.त्यानुसार शनिवारी व रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आज बेळगाव बाजारपेठेत दुपारपर्यंत बरेच व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु होते. आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात धाव घेतली. बस, रिक्षा, वडाप सेवा सुरु होत्या. मात्र प्रवाशांची संख्या कमी जाणवली.