
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर गोरक्षण माळ येथील सतीश दुंडप्पा शिंत्रे यांच्या घरावर शुक्रवार दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १.१० वाजता घराची कौले काढून चोरांनी घरात प्रवेश मिळविला. घरातील लोक जागे झाल्याने चोरांनी आल्या वाटेने पळ काढल्याची घटना घडली आहे. याविषयी सतीश शिंत्रे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, काल रात्री आपल्या घरांवर चोरांनी डाक घातला होता. घरातील आंम्ही सर्वजण चोरांच्या दरवाजा तोडण्याच्या आवाजाने जागे होताच चोर आलेल्या वाटेने पळ काढला आहे. आम्ही घरातील सर्व मंडळी झोपी गेलो होतो. रात्री सव्वा एकच्या दरम्यान दरवाजा तोडण्याच्या आवाजाने आंम्ही जागे झालो. चोरांच्या दिशेने आम्ही येत असल्याचे पाहून चोरांनी जिन्यावरुन पोबारा केला आहे. आमच्या घरावरील कौले काढून चोर प्रथम जिन्यावर पोचले. जिन्यावरुन मजल्या घरकडे येण्याकरिता चोरांनी जिन्याच्या दरवाजा मोडला आहे. चोर मजल्या घरात येताच आम्ही जागे झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला आहे.आंम्ही लागलीच पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी येऊन चोरांचा तपास लावणेचा प्रयत्न केला आहे. पण चोर कोणत्या मार्गे पसार झाले ते अद्याप समजू शकलेले नाही. गोरक्षण माळ येथील कांहीं घर मालकांनी सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरांची छबी उमटली आहे काय याचा शोध पोलिसांनी घेण्याची आवश्यकता आहे. चोरीच्या घटनेनंतर गोरक्षण माळ येथील लोक जागे झाले. लोकांनी देखील चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. चोर दुचाकीने आले असावेत असा अंदाज आहे. कारण धुडूम यांच्या घराजवळच्या खुल्या जागेत दुचाकीच्या खुणा उमटलेल्या दिसत आहेत. चोरांनी आपल्या दुचाकी येथेच थांबविल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चोरीच्या घटनेने गोरक्षण माळ येथील लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
संकेश्वर पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध लावला. चोरांचा कधी लावणार ?
संकेश्वर पोलिसांनी कु. साई काकडे अपहरणकर्त्यांचा लावण्याचे कार्य करुन दाखविले आहे. संकेश्वर पोलिस चोरांचा शोध कधी लावणार? असा प्रश्न लोकांतून विचारला जात आहे.कारण संकेश्वर शेतवाडीतील राम किल्लेदार यांच्या चोरांचा तपास असो जयप्रकाश सावंत यांच्या घरातील दिवसाढवळ्या झालेल्या चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. संकेश्वर पोलिस चोरांना गजाआड करण्यात यशस्वी होतात काय ते पहावे लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta