Thursday , September 19 2024
Breaking News

पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

Spread the love

 

बंगळुरू : किनारपट्टीवरील उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्टपर्यंत कर्नाटक किनारपट्टीवर ताशी 35 ते 45 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पुढील 48 तासांत बंगळुरूमध्ये ढगाळ हवामान राहील. ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा सतत वेग 40-50 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 आणि 21 अंश सेल्सिअस राहील. राज्याच्या किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दक्षिण आतील बेळ्ळारी, बेंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर आणि चित्रदुर्ग, दावणगेरे, कोलार, मंड्या, म्हैसूर, रामनगर, तुमकूर, विजयनगर भागात पावसाचा जोर कमी असेल.

बेळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो. बागलकोट, बेलगाव, बिदर, धारवाड, गदगसह हावेरी, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर, विजयपूर, यादगिरी या भागात हलका पाऊस पडेल. वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. चिक्कमंगळुरू, शिमोगा, हसन, कोडगु येथेही पाऊस असेल.

About Belgaum Varta

Check Also

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

Spread the love  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *