कोप्पळ : कोप्पळ जिल्ह्यातील कुष्टगी तालुक्यातील बिजकल गावात शेततळ्यात पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बिजकल गावाच्या बाहेरील एका शेतात ही घटना घडली. ग्रामपंचायत अध्यक्ष संगप्पा थेग्गीनमनी यांचा मुलगा श्रवणकुमार (८) आणि मल्लम्मा निलप्पा थेग्गीनमनी अशी मृतांची नावे आहेत.
मुले त्यांच्या कुटुंबाच्या शेतात गेली असताना ही दुर्घटना घडली. पावसामुळे शेततळे पाण्याने भरले आहे. मुले पाय घसरून पडली आणि त्यांचा मृत्यू झाला.

Belgaum Varta Belgaum Varta