Tuesday , March 3 2026
Breaking News

सासुकडून सुनेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त: नाराज सुनेची आत्महत्या

Spread the love

 

बिदर : हुंड्यासाठी छळ करणारी सासू काही दिवसांपासून चक्क सुनेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होती. या जाचाला कंटाळून सुनेने आत्महत्या केली.

बिदरमधील ओम वसाहत परिसरात विवाहितेचा सासूकडून छळ होत असल्याने सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनाबाई असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, २०२२ मध्ये अंजनाबाईचे लग्न शेखर नावाच्या पुरूषाशी झाले. लग्नानंतर नवरा आणि सासू तिला वारंवार हुंड्यासाठी छळत होते. काही दिवसांपूर्वी, सासूने सुनेला १ लाख रुपये देण्यास सांगितले होते. तिने तिला घरून आणण्याची मागणी केली होती. अंजनाने नकार दिल्यावर तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.

सासूच्या पैशाच्या लोभाला कंटाळून सून अंजना हिने आत्महत्या केली. बिदर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

About Belgaum Varta

Check Also

धारवाडमध्ये सरकारी भरतीसाठी विद्यार्थ्यांचे भव्य आंदोलन; हजारोंचा सहभाग

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *