कोविडच्या परिणामातून विद्यार्थी सावरले नसल्याने निर्णय
बंगळूर : मार्च-एप्रिल २०२२-२३ मध्ये होणार्या दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) वार्षिक परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने एक गोड बातमी दिली आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स (कृपांक) मिळतील.
गेल्या वर्षी कोविडमुळे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. असेच ग्रेस मार्क्स यंदाही विद्यार्थ्यांनी मिळणार आहेत. शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले की, किमान एकूण गुण मिळवणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना १० टक्के आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पाच टक्के ग्रेस मार्क्स दिले जातील.
कोविड-१९ च्या शिक्षणावरील परिणामातून मुले पूर्णपणे सावरलेली नाहीत. अजूनही त्यांची चिंता कायम असल्याने २०२३ च्या परीक्षेतही त्यांना कृपांक देण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ पर्यंत पाच टक्के पाच टक्के कृपांक देण्यात आल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे परीक्षा झाली नाही. २०२१ मध्ये सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. २०२२ मध्ये १० टक्के ग्रेस मार्क्स देण्यात आले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदाही ग्रेस मार्क्स मिळणार आहेत. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना १० टक्के आणि किमान एकूण गुण मिळवणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना पाच टक्के ग्रेस मार्क्स देण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावीमध्ये सहापैकी तीन विषय उत्तीर्ण झाल्यास, उर्वरित तीन विषयांना किमान एक ते कमाल २६ गुण मिळतील. परंतु, ६२५ गुणांपैकी उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले किमान २१९ गुण दिले जातील. १०० गुणांच्या परीक्षेपैकी २० गुण तोंडी आणि ८० गुणांची लेखी परीक्षा असेल. ८० गुणांपैकी किमान २८ गुण मिळाले पाहिजेत. मात्र, काही विद्यार्थी काही विषयात अधिक तर काही विषयात कमी गुण मिळवतात.
अशा विद्यार्थ्यांना कृपांकाची मदत होईल. ज्या विद्यार्थ्याने उत्तीर्ण होण्यासाठी किमान पात्रता गुण प्राप्त केले आहेत तो अनुत्तीर्ण होऊ नये या हेतूने नियम बनवला आहे. त्याचप्रमाणे, ज्या विद्यार्थ्याने बारावीमध्ये ६०० गुणांपैकी किमान २१० गुण मिळवले आहेत, तो कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळानुसार दोन विषयांमध्ये प्रत्येकी पाच म्हणजे १० गुण मिळवू शकतो.
Belgaum Varta Belgaum Varta