नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अवघ्या काही वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली आहे. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अद्यापही काही मतदारसंघांतील उमेदवारी बाबत चर्चा होणे बाकी आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीनंतरच उमेदवारी यादी जाहीर होईल असे सांगितले आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचा सस्पेन्स रविवारी ही कायम राहिला आहे. बेंगलोर आणि बेळगाव जिल्हा येथील उमेदवारीचा तिढा डोकेदुखी ठरला असल्याचे कळते.
Belgaum Varta Belgaum Varta