मंगळुरू : रेल्वेच्या धडकेने 15 हून अधिक म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळुरूजवळील जोकट्टे येथील अंगरगुंडी येथे घडली.
वृत्त कळताच कद्री अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून रुळावरील गुरांचे मृतदेह बाहेर काढले.
एक मालगाडी कंकनाडीहून एमसीएफच्या दिशेने येत होती. रेल्वेच्या आवाजाने घाबरलेल्या म्हशी रेल्वे पुलावर धावू लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta