Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा पेच वाढला; शपथविधी सोहळ्याची तयारी थांबवली

Spread the love

 

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेस पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची यावर गेल्या चार दिवसांपासून मंथन करीत आहे. तर दुसरीकडे शपथविधी सोहळ्याची तयारी थांबविण्यात आल्याने मुख्यमंत्री पदाचा पेच वाढला आहे. तर पक्षश्रेष्ठी द्विधा मनस्थितीत आहेत.

दरम्यान बुधवारी कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत निर्णय लवकरच कळवला जाईल, असे स्पष्ट केले. मंत्रिमंडळासंबंधी ४८ ते ७२ तासांमध्ये निर्णय घेतला जाईल, असे देखील ते म्हणाले. असे असताना देखील बंगळुरू येथील कांटीरवा स्टेडियम मध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

७५ वर्षीय सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावाला सर्वाधिक आमदारांनी पसंती दर्शवली आहे. पक्षश्रेष्ठींकडून त्यामुळे डीके शिवकुमार यांना विश्वासात घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदासाठी शिवकुमार यांचा विरोध असल्याचे कळतेय. पंरतु, राज्यात वोक्कालिंगा, लिंगायत आणि दलित समाजातील प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री बनवण्यासंबंधी पक्षश्रेष्ठी विचारमंथन करीत आहेत.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवले जाईल. दरम्यान शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांना कुठले मंत्रालय देण्यात येईल, यासंबंधी देखील चर्चा सुरू आहे.

सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासोबत जवळपास १ तास चर्चा केल्यानंतर देखील शिवकुमार यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले नसल्याचे कळतेय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री बनवले तर कुठलाही आक्षेप नसल्याचे शिवकुमार यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान सिद्धरामय्या यांनी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास राहुल गांधी यांची १० जनपथ येथे भेट घेतली. जवळपास एक तास या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. यावेळी आमदार देखील उपस्थित होते.या बैठकीनंतर डीके शिवकुमार यांनी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास राहुल यांची भेट घेतली. यापूर्वी पक्षाचे वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

सिद्धरामय्या ठरताय उजवे
शिवकुमार यांच्या तुलनेत सिद्धरामय्यांची राज्यातील प्रत्येक समाजात चांगली प्रतिमा आहे. दलित, मुस्लिम तसेच मागासवर्गीयांमध्ये सिद्धरामय्यांची पोहोच आहे.जर त्यांना मुख्यमंत्री बनवले नाही तर एक मोठा ‘व्होटबॅंक’ संपुष्टात येईल अशी भीती काँग्रेसला आहे. कुरूबा समाजातून येणारे ओबीसी नेते सिद्धारमय्या यांचा दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी, ओबीसी समाजात व्यापक जनाधार आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *