Wednesday , March 4 2026
Breaking News

चित्रदुर्गजवळ भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

चित्रदुर्ग : चित्रदुर्ग येथे उभ्या असलेल्या लॉरीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला.

कारमध्ये असलेले शमशुद्दीन (40), मल्लिका (37), खलील (42) आणि तबरेज (13) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघे तुमकूर येथील असल्याची माहिती आहे.

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चित्रदुर्गाच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार होस्पेटहून तुमकूरकडे जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि उभ्या असलेल्या लॉरीला धडकली. चित्रदुर्ग ग्रामीण स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *