बेळगाव (वार्ता) : ज्या कारणासाठी बेळगावात सुवर्णसौध उभारली, अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला तो उद्देश सफल झालेला नाही अशी कबुली माजी मुख्यमंत्री व जेडीएस अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. अधिवेशनात भाग घेण्यासाठी मंगळवारी बेळगावात आल्यावर कुमारस्वामी यांनी चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जेडीएस नेते एच. डी. रेवण्णा व अन्य उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, 2006मध्ये ज्या उद्देशाने बेळगावात सुवर्णसौध उभारली तो पूर्णपणे सफल झालेला नाही. उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा व्हावी, सकारात्मक निर्णय व्हावेत हा उद्देश सफल झालेला नाही अशी माझ्यासह सर्वांची भावना झाली आहे असे ते म्हणाले. शेवटच्या 2 दिवसांत उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा करण्याची अनुमती दिल्यासच अधिवेशनाला येईन असे मी सभापतींना आधीच सांगितले होते. त्यामुळेच आज अधिवेशनासाठी आलो आहे, असे कुमारस्वामींनी सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत डीकेशींना सॉफ्ट कॉर्नर आहे का या प्रश्नावर, यात कसला सॉफ्टकॉर्नर आहे अशी टीका मी करणार नाही. गुंडगिरी करणार्यांना सरकारने तडीपार करावे अशी मागणी कुमारस्वामींनी केली.
धर्मांतर बंदी कायद्याला आम्ही कसून विरोध करू असे सांगून कुमारस्वामी म्हणाले, आमच्याकडे बहुमत नाही, वस्तुस्थिती पहिली पाहिजे. मात्र कोणत्याही परिस्थितीत जेडीएस सदस्य विधानसभा आणि विधान परिषदेत या कायद्याला पाठिंबा देणार नाहीत असे स्पष्ट केले.
Check Also
शिक्षण मंत्र्यांनाच येत नाही कन्नड
Spread the loveविद्यार्थ्याच्या शेऱ्यांने मंत्री झाले संतप्त; कारवाईचा दिला आदेश बंगळूर : व्हिडिओ कॉन्फरन्स संभाषणात …