पंतप्रधान मोदी करणार ठाणे-दिवा स्टेशनला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे ते दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे (पाचवी आणि सहावी) लाईन्सचे उद्घाटन करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय लोकललादेखील हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून, यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 छोटे पूल यांचा समावेश आहे. या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीतील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होणार असून, या मार्गांमुळे शहरात 36 नवीन उपनगरीय गाड्या सुरू करता येणार आहेत.