Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

चांद्रयान-3 यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले!

  श्रीहरीकोटा : भारताचे ‘चांद्रयान-3’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. …

Read More »

खानापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण!

  खानापूर :  खानापूर साठीही असाच एक अभिमानाचा क्षण आला आहे. कारण संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असणारी इस्रोची चांद्रयान -3 मोहीम आज शुक्रवारी दुपारी पार पडत असून या मोहिमेत खानापूरच्या प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचे योगदान आहे हे विशेष होय. देशाच्या इतिहासात आजचा शुक्रवार 14 जुलै हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला …

Read More »

खानापूर-बेळगाव सटल बस सुरू करा; खानापूर वकील संघटनेचा रस्ता रोको

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील खानापूर मार्गे बेळगावला दररोज ५००० हून जास्त कॉलेज विद्यार्थी, शिक्षक व नोकरदार मंडळी खानापूरहून बेळगांव व बेळगांवहून खानापूर ये-जा करत असतात. वेळेत बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरवर्गही वेळेत पोचू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बससेवा सुरू करा. या मागणीसाठी खानापूर …

Read More »

खते-बियाणांत अडकले १० कोटी

  पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची पाठ; व्यापारी चिंतेत, आर्थिक व्यवहार ठप्प निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यातील दुकानदारांनी १० कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र वेळेवर पाऊस पडत नसल्याने व्यवहार ठप्प आहेत. याचा दुष्परिणाम आर्थिक उलाढालीवर होत आहे. एकीकडे पावसाच्या भरवशावर व्यापाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. तर दुसरीकडे पाऊस …

Read More »

लखनापुरात चोरी करणारा पेंटर १२ तासात जेरबंद

  चार तोळ्याचे दागिने जप्त; आरोपीची कारागृहात रवानगी निपाणी (वार्ता) : घर रंगवण्यासाठी आलेल्या खुद्द पेंटरनेच घर मालकाच्या घरात असलेल्या तिजोरीतील सुमारे २ लाख रुपये किंमतीचे ४ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केल्याची घटना नजीकच्या लखनापूर येथे गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान अवघ्या बारा तासात बसवेश्वर चौक पोलिसांनी संशयित पेंटरला …

Read More »

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे आजच खातेवाटप?

  मुंबई : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप कधी होणार अशी चर्चा सुरु असतानाच महायुतीत नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं खातेवाटप आजच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं. सोबत राष्ट्रवादीला सहकार, महिला व बाल कल्याण, सामाजिक न्याय ही खाती देखील राष्ट्रवादीच्या …

Read More »

16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस

  उत्तर देण्यासाठी दोन आठवड्याचा अवधी नवी दिल्ली : 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दोन आठवड्यात …

Read More »

काऊंटडाऊन सुरू! आज अवकाशात झेपावणार चांद्रयान-३

  श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-३’ मोहिमेचे २५.३० तासांची उलटगणती गुरुवारी सुरू झाली. आज, शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता ‘एलव्हीएम३-एम४’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने चंद्रयान झेपावेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे. २०१९साली चंद्रयान-२ मोहिमेमध्ये ‘विक्रम’ या लँडरचे …

Read More »

भारत-वेस्ट इंडिज कसोटी; यशस्वी-रोहितची शतके, भारताकडे 162 धावांची आघाडी

  डोमिनिका : कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल दोघांनी शतके झळकावली आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने दोन बाद 312 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल 143 आणि विराट कोहली 36 धावांवर खेळत आहेत. भारताकडे 162 धावांची आघाडी आहे. यशस्वी जयस्वाल आणि विराट …

Read More »

इंदिरा कॅंटीनमध्ये उपलब्ध होणार भाजी-भाकरी

  बेळगाव : गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या इंदिरा कँटीनला राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यापासून अच्छे दिन आले आहेत. कष्टकरी, गरिबांना दिलासा देणाऱ्या या कँटीनमध्ये गेल्या दीड- दोन महिन्यापासून लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून येत असून आता या कँटीनमध्ये भाजी-भाकरी देखील उपलब्ध होणार आहे. इंदिरा कँटीनमध्ये दैनंदिन लाभ घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढू …

Read More »