Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!

  मुंबई : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थरराला सुरुवात होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळण्यात …

Read More »

छ. शाहू महाराज जयंती, व्याख्यान कार्यक्रम उत्साहात

    बेळगाव : भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखा, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद आणि एल्गार परिषद बेळगाव, शाहू फुले आंबेडकर सोशल फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छ. शाहू महाराज यांची 149 वी जयंती साजरी करण्याबरोबर विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. …

Read More »

खानापूर विद्यानगरात गटारीच्या कामाचा शुभारंभ, काम प्रगतीपथावर

  खानापूर : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्या नगरात गटारीच्या कामाचा शुभारंभ नुकताच करून विकास कामे प्रगतीपथावर सुरू आहेत. सरकारच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून खानापूर विद्या नगरात गटारीच्या ७२ मीटर लांबीच्या कामाला मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली. नंदगड गावचे कंत्राटदार रवी वडर यांनी गटारी काम हाती घेतले असुन उत्कृष्ट दर्जाच्या गटारीचे काम …

Read More »

अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार

  मुंबई : भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबाद येथेच होणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानला धक्का दिला आहे. पाकिस्तानची विनंती फेटाळत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे. जय शाह यांनी आज मुंबईत घोषणा केली. वर्ल्ड कप फायनल आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 …

Read More »

देशातील अनेक राज्यांसाठी यलो, ऑरेंज अलर्ट

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि पूराची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू, तर इतर १० जण जखमी …

Read More »

केसीआर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

  सोलापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (केसीआर) यांनी आज सकाळी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भगीरथ भालके यांचा केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश होणार आहे. यानिमित्त केसीआर हे आपल्या मंत्री, खासदार, आमदार, अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह सोमवारपासून दोन दिवसीय सोलापूर शहर- जिल्हा दौऱ्यावर आहेत. केसीआर …

Read More »

खानापूर तालुक्यातील ३५ रस्त्यांचे काम पूर्ण; माजी आमदार अंजली निंबाळकर

  खानापूर : मी आमदार म्हणून कार्यरत असताना विकास हाच दृष्टिकोन ठेवून सरकारदरबारी विकासकामांचा पाठपुरावा केला होता. यात तालुक्यातील ३५ ग्रामीण संपर्क रस्ते आणि चार पुलांच्या विकासाचे काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि ग्रामीण पंचायत राज विकास विभागाच्या अनुदानातून मंजूर झालेले हे रस्ते वापरासाठी सज्ज झाले असून जनतेला …

Read More »

रामनगर येथील बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय नशा विरोधक दिन संपन्न

  खानापूर : रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास समितीचे पदवीपूर्व महाविद्यालय आणि पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दि. २६ रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य निषेध दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम्. एच्. नाईक हे होत. यावेळी रामनगर पोलीस स्थानकाचे पीएसआय श्रीकृष्णकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना …

Read More »

कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार : सी. ए. शशिधर शेट्टी नवे अध्यक्ष

  बेळगाव (प्रतिनिधी) : मॅनेजिंग कौन्सिलच्या दि. २५ जून २०२३ रोजी झालेल्या निवडणुकीनंतर कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (KASSIA) च्या नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. सन २०२३-२४ साठी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष म्हणून सी. ए. शशिधर शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. ए. शशिधर शेट्टी हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील उपकरणांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या …

Read More »

कंग्राळ गल्ली, गांधीनगरतर्फे पावसासाठी गाऱ्हाणे

  बेळगाव : प्रलंबित मान्सूनचे त्वरेने आगमन होऊन बेळगाव शहर आणि परिसरात मुबलक पाऊस पडून पाण्याची समस्या दूर व्हावी, या मागणीसाठी कंग्राळ गल्ली आणि जुने गांधीनगर येथील पंचमंडळी व नागरिकांच्यावतीने ग्रामदैवत श्री धुपटेश्वर देवाला गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम आज सोमवारी भक्तीभावाने पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शोभा सोमनाचे …

Read More »