बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक उद्या रविवार दि. 13 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5.00 वा. श्री साईगणेश सोसायटीच्या सभागृहात, नाथ पै चौक, अंबाबाई मंदिरासमोर शहापूर या ठिकाणी बोलाविण्यात आली आहे. तरी समस्त गणेशोत्सव पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे मंडळाचे अध्यक्ष …
Read More »खानापूर ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक सोमवारी
खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना घटक खानापूर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी यांच्याकडून कळविण्यात येते की, सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ठीक 11 वाजता संघाची मासिक बैठक बोलाविली आहे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे. सभेचे विषय 1. मासिक कार्याचा आढावा 2. त्रैमासिक कार्याची …
Read More »शेतकऱ्यांची वडगावमध्ये उद्या महत्त्वाची बैठक!
बेळगाव : वडगाव, जुने बेळगाव, शहापूर तसेच परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला जनावरांचा दवाखाना चावडी येथे मनपाच्या जागेत अनेक वर्षापासून कार्यरत आहे. वडगाव चावडी येथील जनावरांचा दवाखाना हा परिसरातील शेतकरी व सर्वसामान्यांच्या सोयीचा झाला आहे. पण अलीकडे तेथील व्यवस्था पाहिल्यास जनावरांच्या दवाखान्यात विज नाही तसेच इतर सोयींचाही अभाव आहे. त्यामुळे …
Read More »मनपा आयुक्तांची धडक मोहीम सुरूच
बेळगाव : आज महिन्याचा दुसरा शनिवार हा सरकारी सुट्टीचा दिवस होता. तरीही मनपा आयुक्तांनी सकाळी 5.45 वाजता वाहन गॅरेजला, किर्लोस्कर रोड, खासबाग वेस्ट लँड, ई-कचरा केंद्राला भेट दिली. तेथील रात्र निवारा व्यवस्थेच्या कामाची पाहणी करून माहिती घेतली. श्रीमती शिल्पा कुंभार, ज्युनियर हेल्थ इन्स्पेक्टर यांनी इंदूर मॉडेलनुसार त्यांना नियुक्त केलेल्या …
Read More »टोमॅटोच्या दरात घसरण!
बेळगाव : मागील काही दिवसांपासून टोमॅटोने शंभरी पार केली होती. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचा बजेट कोलमडला होता. मात्र बाजारात आवक वाढल्यामुळे टोमॅटोचा दर 120 रुपयांवरून 70 ते 80 रुपयांवर आला आहे. महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. किरकोळ बाजारात 120 रुपये ते 140 रुपये टोमॅटो विकला जात होता. त्यामुळे …
Read More »“हर घर तिरंगा अभियान” शहापूर पोस्ट ऑफिस राष्ट्रध्वज उपलब्ध
बेळगाव : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीयस्तरावर हर घर तिरंगा 2.0 हे अभियान दि. 01 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. हर घर तिरंगा या अभियानांतर्गत भारतीय डाक विभागामार्फत बेळगाव जिल्ह्यातील डाक कार्यालयात राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे राष्ट्रीय ध्वज 20×30 (इंच) या आकारात 25 रुपयामध्ये …
Read More »बेळगावात शॉर्ट सर्किटमुळे तीन जणांचा मृत्यू!
बेळगाव : बेळगाव शहरातील शाहूनगर, आझम नगर भागात शॉर्ट सर्किटमुळे तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दि. १२ रोजी सकाळी घडली. मृतांत आई, वडील आणि मुलगीचा समावेश आहे. ते लमानी समाजातील एकच कुटुंबातील आहेत. पाणी गरम करायची कॉइल काढतेवेळी शॉक लागल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना एपीएमसी पोलिस …
Read More »बेळगाव महापालिकेला मराठी भाषेची ऍलर्जी; सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नड, इंग्रजीतून
बेळगाव : बेळगाव महापालिकेला मराठी भाषेची ऍलर्जी झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस पुन्हा कन्नड व इंग्रजी भाषेतून देण्यात आल्याने मराठी नगरसेवकांनी या नोटीसा नाकारल्या आहेत. मागील बैठकीच्या वेळी मराठी भाषिक नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर महापौर शोभा सोमनाचे यांनी आश्वासन दिले होते …
Read More »नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हा जामीन दोन महिन्यांसाठी असेल, असे स्पष्ट केले आहे. मलिक हे फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात …
Read More »बंगळूर महानगरपालिका इमारतीत आग, ८ कर्मचारी जखमी
बंगळूर : बंगळूर महानगरपालिकेच्या इमारतीत आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत महानगरपालिकेतील ८ कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta