Monday , September 21 2026
Breaking News

टोमॅटोच्या दरात घसरण!

Spread the love

 

बेळगाव : मागील काही दिवसांपासून टोमॅटोने शंभरी पार केली होती. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचा बजेट कोलमडला होता. मात्र बाजारात आवक वाढल्यामुळे टोमॅटोचा दर 120 रुपयांवरून 70 ते 80 रुपयांवर आला आहे.
महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. किरकोळ बाजारात 120 रुपये ते 140 रुपये टोमॅटो विकला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणात टोमॅटोची जागा चिंचेने घेतली होती. मात्र शुक्रवारी बाजारपेठेत टोमॅटोचा दर कमी झाल्याचे पहायला मिळाले आहे. आवक वाढल्याने टोमॅटो दरामध्ये घसरण झालेली आहे. एरवी 20 ते 30 रू. किलोने विकला जाणारा टोमॅटो शंभरी पार केला. त्यामुळे गृहिणी व हॉटेल व्यवसायिकांचे बजेट कोलमडले होते. बऱ्याच ठिकाणी टोमॅटोचा वापर कमी झालेला होता. मात्र टोमॅटो दरात घट झाल्यामुळे व्यवसायिकांना व गृहिणींना दिलासा मिळालेला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *