Monday , September 21 2026
Breaking News

“हर घर तिरंगा अभियान” शहापूर पोस्ट ऑफिस राष्ट्रध्वज उपलब्ध

Spread the love

 

बेळगाव : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीयस्तरावर हर घर तिरंगा 2.0 हे अभियान दि. 01 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे.
हर घर तिरंगा या अभियानांतर्गत भारतीय डाक विभागामार्फत बेळगाव जिल्ह्यातील डाक कार्यालयात राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे राष्ट्रीय ध्वज 20×30 (इंच) या आकारात 25 रुपयामध्ये उपलब्ध असणार आहेत. यासाठी जीएसटी नाही. ग्राहकांना प्रत्यक्ष कार्यालयात किंवा ऑनलाईन ई-पोस्ट ऑफिस पोर्टलवर दि. 12 ऑगस्ट, 2023 रोजी 23.59 वाजेपर्यंत राष्ट्रध्वज बुक करता येतील. एका व्यक्तीस जास्तीत जास्त पाच राष्ट्रीय ध्वज विकत घेता येतील. शहापूर नाथ पै चौक येथील पोस्ट ऑफिस हर घर तिरंगा या अभियानांतर्गत राष्ट्रध्वज उपलब्ध आहेत. राष्ट्रध्वजाचा सम्मान राखत सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा 2.0 अभियानांतर्गत शहापूर डाक घरातून राष्ट्रध्वज खरेदी करण्याचे आवाहन शहापूर पोस्ट ऑफिस मास्टर एस. आर. जोशी, आर.व्ही अंगडी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *