Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार

  बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घनकचरा विल्हेवाट युनिटसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कामांसाठी तातडीने निविदा मागवून कामाला सुरुवात करावी, काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने बिल अदा करावे, अशा …

Read More »

जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक संपन्न

  बेळगाव : पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना राबवा अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज सोमवारी आयोजित जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या सभेप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे दहावी-बारावीत शहरात प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी सन्मानित

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान रविवारी सायंकाळी जी. जी. सी. सभागृहात आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून जी. एस्. एस्. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे उपस्थित होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सदस्य प्राचार्य व्ही. एन्. जोशी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी सहसचिव विनायक …

Read More »

केएसआरटीसी बस- कार यांच्यात भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी

  कागवाड : कागवाड तालुक्यातील ऊगार बुद्रुक गावाजवळ केएसआरटीसी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. सदर घटना मिरज-जमखंडी राज्य महामार्गावर घडली असून या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाराष्ट्रातील मिरज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पाच जणांची …

Read More »

तीन दिवसांत कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप एकदाच : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बंगळूर : दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार दि. 26 किंवा 27 तारखेला होण्याची शक्यता आहे. राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आल्यानंतरदेखील नूतन मंत्र्यांच्या खातेवाटपाला विलंब होत आहे. दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मंत्र्यांना खातेवाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार …

Read More »

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते सरथ बाबू यांचे निधन

  तेलुगु दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांचे वयाच्या ७१ वया वर्षी निधन झालं. सरथ बाबू यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. दीर्घकाळ आजारी असल्यामुळे त्यांच्य़ावर हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होता. सरथ बाबू यांना रुग्णालयात दाखल करून एक महिन्यांहून अधिक काळ झाला होता. सोमवारच्या सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली …

Read More »

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, संचारबंदी लागू; सैन्यही परतले

  मणिपूर : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सोमवारी (दि. 22) पुन्हा हिंसाचार उसळला. यानंतर भारतीय लष्कर आणि सशस्त्र दलांना येथे परत बोलावण्यात आले आहे. राजधानीच्या न्यू चेकॉन भागात स्थानिक बाजारपेठेत जागेवरून मेईतेई आणि कुकी समुदायाच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर जाळपोळीच्या घटना घडल्या. तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ 144 …

Read More »

सिद्धरामय्या सरकारच्या तिजोरीवर किती हजार कोटींचा बोजा?

  बंगळुरू : सिद्धरामय्या यांनी मागील आठवड्यात शनिवारी म्हणजेच 20 मे रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी ते दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने जनतेला अनेक आश्वासनं दिली होती. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री होताच ती आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहेत. सरकार सत्तेवर येताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …

Read More »

दोन हजाराची नोट घेऊनही वोट नाही, नोटेवरच आली बंदी; सोशल मिडियावर जोक्सचा पाऊस

  निपाणी (वार्ता) : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाला कर्नाटकमधील निवडणुकीशी जोडत सोशल मिडियावर मिम्स, जोक्सचा पाऊस पडत आहे. एवढेच नव्हे तर काहींनी ‘शेवटची ही नोट कधी बघितली आठवत नाही’, अशा पोस्ट निपाणी भागात सोशल मिडियावर शेअर करीत अनेक दिवसांपासून …

Read More »

शिक्षक मित्रांनी केला समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव

  लवटे, हजारे यांचा उपक्रम : समाज बांधवाकडून कौतुक निपाणी (वार्ता) : रानावनात भटकणाऱ्या धनगर समाज बांधवाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा समाज शिक्षणा मध्ये अजूनही प्रगती केलेला नाही. ही बाब गांभीर्याने घेऊन बेनाडी येथील बिरदेव यात्रेच्या निमित्ताने मुख्याध्यापक दत्ता लवटे आणि विज्ञान शिक्षक एस.एस. हजारे या शिक्षक मित्रांनी …

Read More »