निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील चित्रपट निर्माते मंगेश गोटुरे आणि निपाणीतील लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘गाभ’ या मराठी चित्रपटाचा फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर गुरुवारी झाला. कान्स महोत्सवामध्ये ‘गाभ’चा जागतिक प्रिमिअर होणे, हा आमच्यासाठी सर्वाधिक आनंदाचा व समाधानाचा क्षण आहे, अशी भावना निर्माते गोटुरे …
Read More »कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी आम आदमीचे तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून भारतीय महिला कुस्ती पटूवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या महिलांना न्याय मिळावा यासाठी दिल्लीतील जंतर मंतर वर धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी येथील नागरिक आणि आम आदमी पक्षातर्फे तहसीलदारांना शुक्रवारी …
Read More »निपाणीतील दोन युवक बेपत्ता
निपाणी (वार्ता) : येथील अक्कोळ रोड वरील सावंत कॉलनी मधील दोघे युवक १४ हे पासून बेपत्ता झाल्याची तक्रार योहान गुलाब इमॅन्युएल यांनी निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. जोसेफ योहान इमॅन्युएल (वय १७) आणि अखिलेश कमलेश अंतवाल (वय २२) अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत. इमॅन्युएल आणि अखिलेश …
Read More »विश्वभारती कला क्रीडा फौंडेशनतर्फे बेळगावात 11 जूनला मॅरेथॉन
बेळगाव : कारगिल मॅरेथॉनच्या पूर्वतयारीसाठी बेळगावात 11 जूनला विश्वभारती कला क्रीडा फौंडेशनतर्फे मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये विजयी होणाऱ्या धावपटूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विश्व भारती कला क्रीडा फौंडेशनचे सचिव रवींद्र बिर्जे यांनी बेळगावात पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, विश्व भारती कला क्रीडा फौंडेशन ही एक …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दहावी पास विद्यार्थिनींना आवाहन
बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट, हिंदवाडी आणि बी के बांडगी ट्रस्ट बेळगाव च्या वतीने नुकत्याच झालेल्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना रोख रक्कम, सर्टिफिकेट व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमाच्या हायस्कूलमधून शिकलेल्या आणि दहावी परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींनी दहावीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स मुख्याध्यापकाच्या शिफारशीसह …
Read More »झाकीर नाईकमुळे माझा सौरभ ’सलीम’ बनला; दहशतवाद्याच्या पित्याचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली : कट्टरपंथी संघटना हिजबुल-तहरीरशी संबंधत असल्याच्या आरोपाखाली भोपाळ आणि हैद्राबाद येथून 16 जणांना अटक करण्यात आली आहे. या 16 जणांमध्ये एक सौरभ उर्फ मोहम्मद सलीम याचा देखील समावेश आहे. मध्य प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात सहभाग असल्याच्या आरोपावरून त्याला पकडण्यात आले …
Read More »पवारांचा आदेश अन् ठाकरे गट दोन पावले मागे! लोकसभेच्या जागा वाटपाचा मविआ फॉर्म्युला
मुंबई : लोकसभा आणि विधानसभेतील दुसर्या क्रमांकाच्या जागेवर येणार्या निवडणुकीत लक्ष द्या, असे स्पष्ट आदेश शरद पवारांनी दिलेत. अशातच लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर ठरल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं सुरुवातीला 20 जागांवर दावा करणारा ठाकरे गट दोन पऊलं मागं का? असा सवाल उपस्थित होत …
Read More »कै. सौ. मंजुताई शंकरराव पाटील सभागृहाचे उद्घाटन
बेळगाव : व्यवसाय करीत असतानाच आपण मिळवलेल्या नफ्याचा काही भाग समाजासाठी राखून ठेवून लाखो रुपयांच्या देणग्या विविध संस्थांना देणारे अडत व्यापारी शंकरराव गंगाराम पाटील यांनी हयात असताना आपल्या गावासाठी जाफरवाडी गावाकरिता एक सभागृह बांधण्याची योजना आखली होती. ती आता प्रत्यक्षात साकारली असून त्या कै. सौ. मंजुताई शंकरराव पाटील सभागृहाचे …
Read More »मारीहाळ गावातील युवकाची निर्घृण हत्या!
बेळगाव : बेळगावात पुन्हा एकाचा खून झाल्याची घटना रात्री घडली आहे. बेळगाव तालुक्यातील मारीहाळ गावात गुरुवारी रात्री एका युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे. मारीहाळ गावातील महंतेश रुद्रप्पा करलिंगन्नावर (23) या तरुणाची चार-पाच तरुणांनी हत्या केली. हत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी जुन्या वैमनस्यातून ही …
Read More »कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी
शरद पवारांसह देशभरातील महत्त्वाच्या विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण! बेंगळुरु : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत यावर आत्ता शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवणं काँग्रेससाठी सोपं नव्हतं. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु होती. माझ्यासोबत १३६ आमदार आहेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta