खानापूर : सर्वसामान्यांचा वाढता पाठिंबा विकासाभिमुख कामांचे फळ आहे. विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. पूर्व भागासह तालुक्याच्या परिवर्तनासाठी केलेल्या कार्याच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे. पाच वर्षाचे विकासाचे पर्व अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसच्या हाताला साथ द्या, असे आवाहन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. पूर्व …
Read More »डॉ. अंजली निंबाळकर यांचा खानापुरात भव्य रोड शो; मतदारांचा अभूतपूर्व पाठिंबा
खानापूर : तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेस आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरात भव्य रोड शो करून घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी मतदारांचा त्यांना अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व महिला सक्षमीकरणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरात भव्य रोड शो करून घरोघरी प्रचार …
Read More »महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
कोल्हापूर- महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे अल्पशा आजाराने आज (दि.२) कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. कोल्हापुरात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पुत्र तुषार गांधी यांच्या संमतीने वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड) येथील गांधी फौंउडेशनच्या जागेत सायंकाळी ०५ ते ६:३० या …
Read More »राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा समितीचे मावळे व्हा : माजी आमदार मनोहर किणेकर
हिंडलगा : राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे मावळे व्हा, असा सल्ला माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला. काल म ए समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांच्या हिंडलगा परिसरात झालेल्या प्रचार पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. मराठीच्या अस्तित्वासाठी येत्या दहा मे रोजी …
Read More »राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार : शरद पवारांची मोठी घोषणा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतचा निर्णय आज घेतला आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २) केले. यावेळी पवार म्हणाले की, आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला …
Read More »आप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात एकाचा चेंदामेंदा
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर आप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात एकाचा चेंदामेंदा झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अपघातात निधन झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील आप्पाचीवाडी फाट्याजवळ कोल्हापूरहून निपाणी कडे जाणाऱ्या बाजूस असणाऱ्या उतारतीला अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. …
Read More »स्वाभिमान टिकवण्यासाठी समितीला मत द्या
निलेश लंके यांचे आवाहन; गर्लगुंजीत मुरलीधर पाटील यांना प्रतिसाद खानापूर : म. ए. समिती हा पक्ष नाही, पार्टी नाही. मराठी माणसाला स्वाभिमानाने जगविणारी ती संघटना आहे. समितीतून निवडून जाणारे हे आमदार हे पक्षाच्या आमदारासारखे मिरविण्यासाठी नसतात, तर ते मराठी माणसाचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधीत्व करीत असतात. म्हणून मराठी माणसाला स्वाभिमानाने …
Read More »रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ विविध भागात होणार प्रचार
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे. म. ए. समितीचे दक्षिण मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचा येत्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणी जोरदार प्रचार करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. मंगळवारी मजगाव येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे. मंगळवारी व बुधवारी महाराष्ट्रातील विविध नेत्यांच्या …
Read More »निपाणीत आम आदमी पार्टीला वाढता पाठिंबा
उमेदवार उच्चशिक्षित असल्यामुळे नागरिकांच्या आशा वाढल्या. निपाणी (वार्ता) : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व निपाणी विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेश बनवन्ना यांना निपाणी येथील पाटील मळ्यातून आठ ते दहा कुटुंबाचा जाहीर पाठिंबा मिळवलेला असून आम आदमी पार्टीची ताकद निपाणी विधानसभा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे …
Read More »निजद उमेदवार राजू पोवार यांना मतदारांचा वाढता पाठिंबा
विविध गावाच्या मतदारांशी भेटीगाठी निपाणी (वार्ता) : निधर्मी जनता दल व चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार हे निपाणी विधानसभा मतदारसंघातून निधर्मी जनता दल या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. यासाठी स्तवनिधी गव्हाण अंमलझरी यरनाळ या ठिकाणी मतदारांशी गाठीभेटी घेऊन आपल्याला भरघोस मतांनी निवडून आणण्याविषयी सांगितले. माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta