खानापूर : खानापूर जेडीएसचे अधिकृत उमेदवार नासीर बागवान यांनी आपल्या समर्थकासोबत नामपत्र दाखल केले आहे. सोमवारी श्री छत्रपती शिवाजी स्मारक येथे येऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नामपत्र दाखल करण्यासाठी खानापूर तहसीलदार कार्यालयाकडे प्रयाण झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना उमेदवार नासीर बागवान म्हणाले की, खानापूर तालुक्याचा दुर्दैव …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक उद्या
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे चारही मतदार संघासाठी उमेदवार निश्चित झाले असून उमेदवारांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीसाठी बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर, दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, ग्रामीणमधून आर. एम. चौगुले आणि खानापूरमधून मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी …
Read More »ज्येष्ठ सीमा सत्याग्रही काॅ. कृष्णा मेणसे यांचे कोंडुसकरना आशीर्वाद
बेळगाव : बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सकाळी ज्येष्ठ सीमा सत्याग्रही व कामगार नेते काॅ. कृष्णा मेणसे यांची सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीसाठी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सोमवारी सकाळी सरस्वतीनगर …
Read More »माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा काँग्रेस प्रवेश
नवी दिल्ली : कर्नाटक राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षणोक्षणी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या पाठोपाठ, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काल भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला. त्यानंतर शेट्टर यांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने शेट्टर यांना हुबळी-धारवाड सेंट्रल मधून उमेदवारी …
Read More »महामार्गावरील वृक्षांची तोड; रस्ता झाला उजाड
सावली गायब : प्रवाशांना उन्हाचा सामना कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या दोन्ही बाजूच्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे. महामार्गाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या वृक्षांची तोडणी झाल्याने महामार्ग उजाड दिसू लागला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने महामार्गावरून जाताना …
Read More »आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराचा झंझावाती शुभारंभ
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज उचगाव येथील श्री मळेकरणी देवस्थानात पूजन करून प्रचाराचा झंझावाती शुभारंभ केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री मळेकरणी देवस्थानात पूजन …
Read More »आर. एम. चौगुले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या वननेस प्राईड येथे मोठ्या थाटामाटात करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी आणि समितीला विजयी करण्याचा निर्धार करत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. ऍड. …
Read More »निपाणकर राजवाडा येथे विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाची सांगता
निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या देव बोलवायचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध देव व जग निपाणकारांचे सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीचा जग, श्री क्षेत्र श्रीशैल आंध्र प्रदेश महादेवाची पालखी, काठी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर, जोतिबांच्या काठीचे निपाणकर राजवाड्यामध्ये पूजन झाले. श्रीमंत दादाराजे …
Read More »लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्काराने डॉ. आंबेडकर जयंती
निपाणी (वार्ता) : येथील लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून वेगळा उपक्रम राबविला. फाउंडेशनतर्फे नगरपालिकेच्या आवारातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. दुपारच्या सत्रामध्ये महात्मा फुले नगर मधील कबीर वराळे गुरुजी यांच्या प्रांगणामध्ये जयंती सोहळा पार पडला. …
Read More »२७ मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक!
बेळगाव : पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणारी चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी काढण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. शिवजयंती उत्सव दि. २२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणूक काढण्यास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta