Saturday , November 7 2026
Breaking News

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा काँग्रेस प्रवेश

Spread the love

 

नवी दिल्ली : कर्नाटक राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षणोक्षणी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या पाठोपाठ, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काल भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला. त्यानंतर शेट्टर यांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने शेट्टर यांना हुबळी-धारवाड सेंट्रल मधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे कळते. दरम्यान शेट्टर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपला उत्तर कर्नाटकात मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *