Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

“शिवसन्मान” पदयात्रेचे विविध भागात जल्लोषी स्वागत

  समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांना पाठिंबा बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान जपण्यासाठी काढण्यात आलेल्या आजच्या “शिवसन्मान” पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी पिरनवाडी ते भवानीनगर या भागात भगव्याचा जागर करण्यात आला. पिरनवाडी येथून शिवनावाचा जयघोष करीत शिवसन्मान पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ब्रह्मनगर, खादरवाडी, राजारामनगर या …

Read More »

बीपीएल कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो मोफत तांदूळ कॉंग्रेसची तिसरी घोषणा

  बंगळूर : कर्नाटक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसरी ‘हमी’ योजना जाहीर केली, अन्न भाग्य योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येकसदस्याला दरमहा दहा किलो मोफत तांदूळ देण्याचे आश्वासन दिले. शुक्रवारी (ता. २४) बंगळुर येथे एका एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रद्श कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जाहीर केले, की पक्षाच्या …

Read More »

1132 कोटी रुपयांच्या जलजीवन प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन : मंत्री कारजोळ

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जिल्ह्यात आगमन सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत, अशी विनंती जिल्हा पालक मंत्री गोविंद काराजोळ यांनी केली. २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मालिनी सिटी मैदानावरील तयारीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. कृषी सन्मान योजनेचे निधी हस्तांतरण, रेल्वे विकास प्रकल्प आणि …

Read More »

रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण आणि लोंढा-बेळगाव- घटप्रभा दुपरीकरण मार्गाचे उद्घाटन

  मंत्री गोविंद कारजोळ यांची माहिती बेळगाव : मंगळवार दिनांक 27 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावला येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ते विविध विकास कामांचा शुभारंभ आणि नव्या कामांना चालना देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण आणि बेळगाव, लोंढा, घटप्रभा या मार्गावर झालेल्या रेल्वेच्या दुपदरीकरण कामाचे उद्घाटन …

Read More »

अनगोळ बालकावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

  कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी नागरिकांवर चाल करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आदर्श नगर राम कॉलनी येथील एका इसमाचा बळी गेला आहे. मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाची माहिती असली तरीही महापालिका या …

Read More »

सर्व जातीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन

  बेळगाव : श्री दुर्गा देवी हे सर्व जातींच्या वधू-वरांसाठी सुचक केंद्र आहे यांच्यावतीने प्रथमच राज्य पातळीवरील सर्व जातीय वधू-वरांचा मोठा मेळावा खडे बाजार येथील मजुकर कॉम्प्लेक्समध्ये भरवण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशन संस्थापिका मीनाताई बेनके या उपस्थित होत्या. या मीनाताई बेनके, केपन्ना भंग्याघोळ, हनुमंत मजुकर, …

Read More »

उचगावात भव्य भारुडी भजन स्पर्धा

  उचगाव : उचगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताह उत्सवानिमित्त सोमवार दिनांक ६ मार्च २०२३ ते रविवार दिनांक १२ मार्च २०२३पर्यंत होणार असून या सप्ताह निमित्त यावर्षी “भारुडी भजन स्पर्धांचे” आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी एक लाख रुपयाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी याचा भारूड भजन संघानी लाभ …

Read More »

निपाणी येथील शर्यतीत शिवानंद भोसलेंची घोडागाडी प्रथम महाशिवरात्रीनिमित्त आयोजन 

निपाणी (वार्ता) : महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी (ता.२३) सायंकाळी आयोजित जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये निपाणीच्या शिवानंद भोसले यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५ रुपयांचे बक्षीस मिळविले. या शर्यतीमध्ये यांच्या यमगरणीच्या रामचंद्र मोरे यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये बक्षीस पटकाविले. तर …

Read More »

राम कॉलनीत सांडपाण्याची समस्या गंभीर, महापालिका गुंतली पीएम दौऱ्यात, नागरिक वाऱ्यावर

  बेळगाव : शहर उपनगरातील विविध ठिकाणच्या स्मार्ट सिटी कामांतर्गत झालेल्या चुकांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे.अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनला गळती लागल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यातच उपनगर परिसरातील आदर्श नगर राम कॉलनी परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून सांडपाण्याची समस्या कायम असून, गेल्या पाच दिवसांपासून येथील ड्रेनेज चेंबर मधून सांडपाणी बाहेर …

Read More »

कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी …

Read More »