Wednesday , June 3 2026
Breaking News

Belgaum Varta

ऍड. नागेश सातेरी यांचा १८ जूनला अमृतमहोत्सव

  बेळगाव : कामगार नेते ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा १८ जूनला साजरा करण्यात येणार आहे. समारंभाला नामवंत लेखक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ऍड. नागेश सातेरी अमृतमहोत्सव सोहळा समितीच्या मंगळवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. समितीचे अध्यक्ष प्रा. आनंद …

Read More »

बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन

  बेळगाव : कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने बेळगावमध्ये के एल ई जिरगे हॉल येथे ९ ते ११ जून या कालावधीत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या तसेच पब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक एच.आर. रंगनाथ हे असणार आहेत. आज …

Read More »

बीम्सला आमदार राजू सेठ यांची भेट

  बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची सूचना करून सरकारकडून आवश्यक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजू सेठ यांनी जोमाने कामाला …

Read More »

रेशन तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ!

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बाची या गावात रेशन तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ आढळून आला असून लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेकायदेशीर रित्या बीपीएल कार्डचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांविरोधात कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र अलीकडे रेशन तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्लास्टिकचा तांदूळ वितरित करून …

Read More »

जायंट्स मेनच्या वतीने तंबाखू विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन

  बेळगाव : संपूर्ण जगभरात सिगारेट, मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे जणू आता शरीराच्या सवयीचा भाग झाला आहे. कोणी तणावमुक्त जगण्यासाठी तर कोणाच्या जीवनात वाईट प्रसंग घडल्यावर, कोणी अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतो आणि त्याची चटक लागली की त्या व्यसनाच्या आहारी जातो. खासकरून तंबाखू सेवन सिगारेट आणि गुटखा …

Read More »

कर्नाटकला ५ टीएमसी पाणी साेडावे : सिद्धरामय्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

  बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी लिहलेल्या पत्रात उत्तर कर्नाटकातील पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती सांगितली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी वारणा/कोयना जलाशयातून २ टीएमसी तर उजनी जलाशयातून 3 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला पत्राद्वारे केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

“…तर भाजपाचा पराभव करणं शक्य”, राहुल गांधींचं अमेरिकेत विधान

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (३१ मे) कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील सिलिकॉन कॅम्पसमध्ये राहुल गांधींनी नागरिकांना संबोधित केलं. तेव्हा राहुल गांधींनी भाजपाबाबत मोठं विधान केलं आहे. “विरोधी पक्ष एकत्रित झाला, तर केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव करणं शक्य आहे,” असं राहुल गांधींनी कर्नाटकचं उदाहरण देत सांगितलं …

Read More »

“भारताची नवी संसद सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी”, दिग्विजय सिंह आणि तृणमूलने पंतप्रधान मोदींना घेरलं

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२८ मे) संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. या सोहळ्यावर अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं अशी विरोधी पक्षांनी मागणी होती. परंतु सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या मागणीला जुमानलं नाही. अखेर स्वतः नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

वडणगे येथे दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; मधुमेहावरील औषध घेतल्यानंतर आली रिॲक्शन

  कोल्हापूर : वडणगे (तालुका करवीर) येथील दिंडे कॉलनीमध्ये राहणारे मधुकर दिनकर कदम (वय 59) व जयश्री मधुकर कदम या दाम्पत्याचा बुधवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन येऊन या पती-पत्नीचा मृत्यू झाला असावा. अशी शक्यता या दापत्याच्या मुलींनी वर्तवली आहे. दोघांचाही व्हिसेरा राखून ठेवण्यात …

Read More »

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आवाहन

  बेळगाव : 1 जून 1986 मध्ये हिंडलगा, बेळगुंदी व इतर भागात झालेल्या कन्नड भाषा सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना 1 जून 2023 रोजी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तालुका म. ए. समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मराठी भाषिकांनी हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे सकाळी ठीक 8=30 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, …

Read More »