मुंबई : गुजरातच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 100 तोंडी रावण म्हटल्यानंतर भाजपने गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे म्हटले. मात्र, जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? …
Read More »यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा : उदयनराजे भोसले
रायगड : ‘कुठल्याही प्रकारचे राजकारण येऊ देऊ नका, आपलं कोणतंही स्वार्थ नाही. यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा, काय होईल त्यावेळेस आपआपल्या परीने पाहून घेऊ. अवमान करणाऱ्यांना वेळ दाखवण्याची वेळ आली आहे. मन आज व्यथित झालं आहे. दुखीत झालं आहे. आज व्यथित होऊन चालणार नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाऊन बांधणी …
Read More »पद्मनाभ पीठ येथे मार्गशीर्ष गुरुवर दत्तगुरुवर सोहळा संपन्न
पणजी : कुंडई गोवा येथील दत्त पद्मनाभ पीठ येथे मार्गशीर्ष गुरुवर दत्तगुरुवर सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. पद्मश्री ब्रह्मानंद स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हा आश्रम चालतो. सदर सोहळ्यामध्ये डॉ. सोनाली सरनोबत यांनी जीवनामध्ये अध्यात्मासोबत आरोग्याचे महत्व पटवून दिले. सदर कार्यक्रम खानापूर …
Read More »अल्पसंख्याक मतदारांना यादीतून वगळले नाही; मुख्यमंत्री बोम्मईंचे स्पष्टीकरण
बंगळूर : अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. ते हुबळी येथे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की मतदार ओळखपत्र घोटाळ्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष घातले आहे. मतदारांची नावे मतदार यादीत जोडण्याची किंवा काढून टाकण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली केली …
Read More »सौंदलगा येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या गोडाऊनचे उद्घघाटन
सौंदलगा : सहकार क्षेत्रात सौंदलगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचा दबदबा, संघाने १०४ वर्षात केलेली प्रगती व सभासदांच्यासाठी दिलेली सेवा महत्त्वाची, असे प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोल्ले, संचालक बीडीसीसी बँक बेळगाव यांनी सौंदलगा येथे प्राथमिक कृषी पत्तीन कडून बांधण्यात आलेल्या गोडाऊनचे उद्घाटन करताना आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोडाऊनचे उद्घाटन …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नारायण मयेकर यांची बिनविरोध निवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांनी दिल्यामुळे गेली २५ वर्षे नगरसेवक म्हणून उच्चांक गाठलेले ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून शुक्रवारी दि. २ डिसेंबर रोजी निवड झाली. यावेळी निवडून अधिकारी तहसीलदार प्रविण जैन होते. यावेळी नगरपंचायतीच्या १९ नगरसेवकांनी नारायण मयेकर यांचा अर्ज …
Read More »कर्नाटकाच्या भूमीचे, जनतेचे रक्षण करण्यास वचनबद्ध : मुख्यमंत्री बोम्मई
बेळगाव : कर्नाटकाच्या भूमीचे आणि जगभरातील कन्नडिगांचे रक्षण करण्यास आणि विकास करण्यास सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी येथे आज 671.28 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन केल्यावर ते बोलत होते. बोम्मई पुढे म्हणाले, आमचे सरकार एकात्मिक कर्नाटकच्या विकासासाठी काम करत आहे. …
Read More »चोर्ला घाटातील दरीत कार कोसळून दोन ठार
खानापूर : चोर्ला घाट दिवसेंदिवस धोकादायक बनत असून अपघाताचे सत्र सुरूच आहे काल रात्री या घाटात महाराष्ट्रातील एमएच 48 बीटी 5968 क्रमांकाची कार खोलदरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत. चोर्ला …
Read More »चलवादी समाजाची 4 डिसेंबरला बैठक
बेळगाव : राज्यात चलवादी समाजाची लोकसंख्या सुमारे २ कोटी आहे. चलवादी समाजाच्या मल्लेश चौगुले यांनी सांगितले की, बेळगाव येथील अंजुमन हॉलमध्ये 4 डिसेंबर रोजी चलवादी समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे.शुक्रवारी शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आपल्या समाजाला ते मिळत नाही. आपल्या …
Read More »बेळगावमध्ये वकिलांचा कामकाजावर बहिष्कार
बेळगाव : कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग कायमस्वरूपी फिरत्या खंडपीठासाठी जिल्हा ग्राहक आयोगाची इमारत निवडण्यासाठी आणि बेळगावमध्ये अतिरिक्त ग्राहक आयोग स्थापन करण्यासाठी बेळगावच्या वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला. शुक्रवारी बेळगाव बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकत जिल्हाधिकारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta