खानापूर : खानापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा राजरोजपणे चालू आहे. एकीकडे प्रशासनाने वाळू उपसावर बंदी घातली आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या कृपाशीर्वादाने बेकायदा वाळू उपसा चालू आहे. मणतुर्गा येथील हालात्री नदीपात्रात खुलेआम बेकायदा वाळू उपसा चालू आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी गढूळ होत आहे. हे गढूळ पाणी जनावरांना पिण्यालायक रहात नाही. तसेच …
Read More »पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, सुरक्षा कवच तोडून तरुण कारजवळ पोहोचला
हुबळी : कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान एक तरुण अचानक त्यांच्याकडे धावत आला आणि त्याच्या कारपर्यंत पोहोचला. खरे तर त्या तरुणाला पंतप्रधानांना फुलांचा हार घालायचा होता. त्यासाठी त्याने कोणताही विचार न करता एसपीजीचा …
Read More »प्रगतिशील लेखक संघात उद्या विवेकानंद जयंती
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांचे स्वामी विवेकानंद : जीवन व कार्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथील भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम …
Read More »विवेकानंद मल्टीपर्पज सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद जयंती साजरी…
बेळगाव : येथील विवेकानंद मल्टीपर्पज सोसायटीतर्फे दि.12 जानेवारी रोजी सोसायटीच्या कार्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी अध्यक्ष कुमार पाटील व उपस्थित पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर 11 सप्टेंबर रोजीचे स्वामी विवेकानंदांचे शिकागो मधील ऐतिहासिक भाषण व त्याच दिवशी नंतर अमेरिकेवर ओसामांनी …
Read More »इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
प्रियांका खांडके यांचे मार्गदर्शन : ४०० विद्यार्थ्यांची तपासणी निपाणी (वार्ता) : येथील इनरव्हील न्यू जेन ग्लोरी क्लबतर्फे सीएमसी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दंत तपासणी शिबीर पार पडले. यावेळी सुमारे ४०० विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून त्यांना टूथब्रशचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रियांका खांडके उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते …
Read More »खानापूरच्या वैभव पाटीलचे सुयश
खानापूर : इंडियन साउथ वेस्ट झोन युनिव्हर्सिटी अथलांटिक चॅम्पियनशिप स्पर्धा 2022-23 दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी 5000 मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुमार वैभव पाटील यांनी भाग घेऊन योग्य वेळ नोंदवत टॉप 15 मध्ये यश संपादन करून पंधरावा क्रमांक नोंदवून अखिल भारतीय युनिव्हर्सिटी अथलांटिक स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. या यशाकरिता प्राथमिक …
Read More »तिरंगा ध्वज अवमानप्रकरणी 6 वर्षानंतर साक्ष
बेळगाव : 2017 मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयावर परिवहन मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहण केले होते. मात्र यावेळी तिरंग्यापेक्षा लालपिवळा ध्वज अधिक उंचीवर फडकत होता. राष्ट्रध्वजाचा गौरव नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी म. ए. समितीचे कार्यकर्ते मदन बामणे यांनी 27 जानेवारी रोजी मार्केट पोलीस स्थानकात रीतसर तक्राक नोंदविली व संबंधित अधिकाऱ्यांवर …
Read More »रक्तदान करून सहकार्य करा
निपाणी रोटरी क्लबचे आवाहन : रक्ताचा तुटवडा निपाणी (वार्ता) : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून रक्तदात्यांची संख्या घटली आहे. पण अपघात, शस्त्रक्रिया व इतर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शहर व परिसरातील रोटरी क्लबला रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन येथील रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. गेल्या २८ वर्षापासून येथील …
Read More »स्वच्छतागृहात जादा रकमेच्या आकारणीवरून बसस्थानकात ‘आप’चे आंदोलन
निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहामध्ये स्त्री व पुरुषाकडून कंत्राटदाराकडून अवाजवी रक्कम घेतली जात जात आहे. याबाबत बऱ्याचदा आगारप्रमुखाकडे तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर या घटनेचे गांभीर्य ओळखून आम आदमी पक्षाच्या येथील कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत सदर घटने बाबत आगारप्रमुखांना भेटून हा प्रकार थाबविण्यास सांगितले. बसस्थानकात स्त्रियांकडून लघुशंकेसाठी ५ …
Read More »संस्कारासाठी पालकांचे प्रबोधन आवश्यक
डॉ. स्नेहल पाटील : पडलिहाळ दृढसंकल्प कार्यक्रम निपाणी (वार्ता) : आजच्या आधुनिक काळात मुलांच्या प्रबोधनापेक्षा त्यांच्या पालकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. मुलांच्यामध्ये उत्तम पद्धतीचे संस्कार रुजवण्यासाठी पालकांमध्येच खऱ्या अर्थाने प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. स्नेहल पाटील यांनी व्यक्त पडलीहाळ येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९२ वी जयंतीनिमित्त ‘ज्योत प्रबोधनाची, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta