
निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहामध्ये स्त्री व पुरुषाकडून कंत्राटदाराकडून अवाजवी रक्कम घेतली जात जात आहे. याबाबत बऱ्याचदा आगारप्रमुखाकडे तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर या घटनेचे गांभीर्य ओळखून आम आदमी पक्षाच्या येथील कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत सदर घटने बाबत आगारप्रमुखांना भेटून हा प्रकार थाबविण्यास सांगितले.
बसस्थानकात स्त्रियांकडून लघुशंकेसाठी ५ रूपये तर पुरुषांना शौचालयसाठी १० रूपये आकारले जात आहेत. बस स्थानकात येणाऱ्या सर्वच प्रवाशासाठी अधिकृतपणे लघुशंकेसाठी पूर्णपणे मोफत व शौचलयासाठी १ रूपये असे फलक लावण्यात आले तरीही संबंधित कंत्राटदाराकडून अवाजवी वसुली केली जात आहे. ही वसुली कित्येक वर्षापासून केली जात आहे. येथील कंत्राटदारांनाही समज देऊन जनतेसाठी सहकार्य करण्यासाठी निर्देश दिले. तरी महिला युवतीनी लघुशंकेसाठी रक्कम देवू नये, असे आवाहन केले आहे. शिवाय पुरुषांच्या शौचालयासाठी ५ रुपये आकारणीची मागणीही करण्यात आली.
यावेळी डॉक्टर राजेश बनवन्ना, प्रा.कांचन बिरनाळे-पाटील, नंदकिशोर कंगळे, लतिफा पठाण, राजू हिंग्लजे, दीपक शिंदे, प्रकाश पोळ, पंकज कांबळे, इरापा वडर, सलीम मुजावर, संतोष वडर, सुनील वडर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.