बेळगाव : जीवनात यशस्वी उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजेत. त्यांनी सतत बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे, असे मत भारतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नवर यांनी व्यक्त केले. नुकतेच भारतेश एज्युकेशन ट्रस्टच्या ग्लोबल बिझनेस स्कूलने M.B.A. 2020-2022 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांच्या पदवी दिन आणि समापन समारंभाचे उद्घाटन करताना ते …
Read More »पुस्तकांच्या वाचनाने जीवनाला उभारी
प्रा. नानासाहेब जामदार : अर्जुनी वाचनालयात गुणवंतांचा सत्कार निपाणी (वार्ता) : वाचन हा जीवनातील अविभाज्य घटक असला पाहिजे. वाचनातून मिळणारे ज्ञान कुठेच मिळत नाही. हताश व निराश झालेल्या जीवाला उभारी देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके जगण्याची उर्मी देतात. यासाठी प्रत्येकाने दिवसातील थोडा वेळ वाचनासाठी दिला पाहिजे, असे प्रतिपादन देवचंद …
Read More »कोगनोळी बिरदेव मंदिरात भाविकांची गर्दी
शनिवारी पहाटे मुख्य भाकणूक : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा व शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त मंदिराचे रंगकाम व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंगळवार तारीख 18 रोजी मानकरी, …
Read More »करंबळ गावच्या नितीन पाटील याचे शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये यश
खानापूर (प्रतिनिधी) : इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन ऑफ बेळगाव टीमचा खेळाडू व करंबळ (ता. खानापूर) गावचा सुपूत्र नितीन पाटील याने राज्य पातळीवर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये खानापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करत तीन गोल्ड मेडल जिंकून खानापूरच्या नाव लौकिकात भर टाकली आहे. नुकताच सप्टेंबरमध्ये चित्रदुर्ग, हुईना, व शिमोगा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये …
Read More »खानापूर चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळेत पेव्हर्स कामाचा शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील उच्च प्राथमिक मराठी मुलांची व उच्च प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेच्या पटांगणात एमएलसी हणमंत निराणी यांच्या फंडातून पेव्हर्स बसविण्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, एसडीएमसी अध्यक्ष धाकटा गुरव, भाजप तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषा आणि मराठी अस्मिता टिकविण्यासाठी तालुक्यात ज्ञानेश्वरी पालकी सोहळा व तुकाराम गाथा पूजन तालुक्यातील गावोगावी करण्याचा निर्धार करण्यात येत असून त्याची जनजागृती करण्यात येत आहे. आज बुधवारी लालवाडी, कारलगा, शिवोली, अल्लेहोळ, हडलगा, खैरवाड, हेब्बाळ, नंदगड या गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी समिती …
Read More »तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी
दक्षिण विभाग काँग्रेसच्यावतीने जोरदार निदर्शने बेळगाव : टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी दक्षिण विभाग काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सकाळी “त्या” उड्डाणपलावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन छेडण्यात आले. आमदार माजी आमदार रमेश कुडची यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिसऱ्या रेल्वे गेट येथील नव्या उड्डाण …
Read More »बेळगाव येथील चोरी प्रकरणी राजस्थानमधून तीन आरोपींना अटक
बेळगाव : शहरातील मार्केट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बागवान गल्ली येथील एका दुकानातील चोरीप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून तीन आरोपींना अटक केली. 13 ऑक्टोबर रोजी सदरुद्दीन चौधरी यांच्या दुकानातून 4 लाख रोख रक्कम चोरीला गेली. याप्रकरणी सदरुद्दीन यांनी मार्केट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि राजस्थान पोलिसांच्या …
Read More »50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक; लोकायुक्त पोलिसांची कारवाई
बेळगाव : बेळगावच्या जिल्हा उद्योग केंद्राचे संचालक आणि सहाय्यक संचालकांना सबसिडी मंजुरीचे पत्र देण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. सहसंचालक आर. एच. शिवपुत्रप्पा आणि सहाय्यक संचालक पद्मकांत जी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत लोकायुक्त पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा उद्योग केंद्राच्या एका योजनेचे लाभार्थी …
Read More »समस्या सोडविल्या नाहीत तर ग्राम पंचायतीला टाळे ठोकण्याचा कडोली ग्रामस्थांचा इशारा
बेळगाव : कडोली येथील वैजनाथ गल्ली अनेक वर्षांपासून रस्ता, गटारी, पिण्याचे पाणी, पथदीप अश्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. तसेच जलजीवन पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता खोदून जलवाहिनी घातल्यामुळे समस्येत आणखीनच भर पडली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. वैजनाथ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta